bharne. 
पुणे

इंदापूरचे आमदार भरणे अजित पवारांच्या पाठीशी?

राजकुमार थोरात

वालचंदनगर ः  मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला. सध्याच्या राजकीय परस्थितीवर इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सध्या तरी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
 राज्यामध्ये भाजप व अजित पवार यांची युती झाल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. भाजप व अजित पवारांच्या युतीचा इंदापूरच्या राजकारणावर परीणाम होणार आहे. 

आमदार दत्तात्रेय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर व विश्‍वासू आमदार मानले जातात. २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. तसेच अजित पवार यांच्यामुळे त्यांना जिल्हा बॅंकेचे अध्यक्षसह अनेक महत्वाचे पदे भूषविता आली आहे.

२०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दोन वेळा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी सर्व ताकद भरणे यांच्या पाठीमागे उभी केली होती. त्यामुळे आता भरणे हे अजित पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात भरणे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या त्यांनी विवाह समारंभ असून नंतर बोलू असे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT