indapur police action on iligel gutka transportation gukta worth 50 lakh Seized
indapur police action on iligel gutka transportation gukta worth 50 lakh Seized sakal
पुणे

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर इंदापूर पोलीसांची कारवाई

डॉ. संदेश शहा

इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर लोणी देवकर गावच्या हद्दीत दि. १५ जून रोजी पहाटे गस्त सुरू असताना इंदापूर पोलीसांनी अवैध गुटखावाहतूक करणाऱ्या ट्रकवर थेट कारवाई करून ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वा खालील ही सहावी मोठी कारवाई असून त्यामुळे गुटखा माफियांना चाप बसला आहे. इंदापूर पोलीस गस्त घालत असताना त्यांना लोणी देवकर हद्दीत सोलापूरच्या बाजूने पुणे-मुंबई बाजूस जाणार्‍या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकचा (केए- ५६, ५५८८) संशय आला. त्यामुळे ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये अवैधरित्या मानवी जीवनात अपायकारकठरणाऱ्या व शासनाने बंदी घातलेला रोकडा व बंदर या नावाने परिचित असलेला गुटखा आढळून आला.

त्यामुळे इंदापूर पोलिस ठाण्यात गाडी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,विभागीय पोलिस अधीकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस नाईक महेंद्र पवार, पोलीस नाईक सलमान खान,बापू नाईक,जगन्नाथ कळसाईत व मोहम्मद अली मडी ,पोलीस हवालदार अमोल खैरे व श्री बालगुडे, पोलीस शिपाई विशाल चौधर, लक्ष्मण सूर्यवंशी, अकबर शेख, पोलीस मित्र महादेव गोरवे,शुभम सोनवणे, हनुमंत मोटे, अनिल शेवाळे, भाऊ कांबळे यांनी केली.

इंदापूर पोलिसांनी गुटख्यावर केलेली कारवाई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असली तरी इंदापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मात्र गुटखा खुलेआम विकला जातो ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर शहरासह तालुक्यातील गुटखा विक्री बंद करून इंदापूर गुटखा मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT