इंदापूर : खाजगी वाहन चालकांचा अव्वाच्या सव्वा दर; पोलीसांनी थांबवली लूट sakal
पुणे

इंदापूर : खाजगी वाहन चालकांचा अव्वाच्या सव्वा दर; पोलीसांनी थांबवली लूट

एस टी कामगार बेमुदत संपावर गेल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे महत्वपूर्णमोक्याचे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र इंदापूरआगारा तील एस टी कामगार बेमुदत संपावर गेल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळेआज प्रवाशी बाहेर रस्त्यावर तर बसस्थानकात मात्र संरक्षणासाठी पोलीस असे चित्र होते. नुकताच दिवाळीचा सण झाला, भाऊबीज झाली. सणासाठी इंदापूर शहर व परिसरात आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. कोरोना निर्बंध सैल झाल्यामुळे आपल्या नाते वाईक, हितचिंतक तसेच शेती कामाचेवार्षिक नियोजन करण्यासाठी अनेक नोकरदारमंडळी आपली पत्नी, मुलाबाळासह गावी आली होती.

मात्र शहरात परतीच्या वेळी नेमका संप सुरू झाल्यामुळे त्यांना मिळेल त्या गाडीने शहरात जायचे होते. मात्र एस टी बंद चा फायदा उठवत खाजगी वाहन चालकांनी अक्षरशः नागरिकांची लूट केली. ऐरवी इंदापूर ते पुणे एस टी प्रवासास २१० ते २५० रुपये लागत होते मात्र त्यासाठी आज ६०० ते ७०० रुपये मोजावे लागले. इंदापूर ते बारामतीचे तिकीट ८० ते ९० रुपये असताना २०० तर इंदापूर ते अकलूज तिकीट ४० ते ५० असताना खाजगीवाल्यांनी त्यासाठी १०० ते १२० रुपये आकारणी केली. अखेर काही पत्रकारांनी या लुटीची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी बस स्थानक परिसरात प्रवाशी घेताना तीन वाहन

चालकांना रंगेहात पकडून कारवाई केल्या नंतर या प्रकारास चाप बसला मात्र तोपर्यंत खाजगी वाल्यांची दिवाळी झाली तरप्रवाश्यांचे दिवाळे निघाल्याची चर्चा रंगली.ही लूट सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभाग सुस्त होता. त्यामुळे पोलीसांवर अतिरिक्त ताण आला तर प्रवाश्यांना मनस्ताप झाला.त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून शासन व प्रशासनाने आदर्श आचारसंहिता तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रवाश्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT