plantation  sakal
पुणे

इंदापूर रयत शाळा प्रांगणात ३०० झाडांची लागवड.

स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी ज्ञानवंत व गुणवंत होण्यासाठी शिक्षकांनी सर्वोच्चप्राधान्य देणे गरजेचे

डॉ. संदेश शहा

इंदापूर : स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी ज्ञानवंत व गुणवंत होण्यासाठी शिक्षकांनी सर्वोच्चप्राधान्य देणे गरजेचे असून विद्यालयातदर्जेदारपायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक स्कूल कमिटीसदस्य प्रदीप गारटकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनि अर कॉलेज प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक स्कूल कमिटीसदस्य प्रदीप गारटकर,मुख्याध्यापक रामचंद्र पाटील ,पर्यवेक्षक विजय शिंदे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, सन ७९-८० वर्गाचे अरुणा कारंडे, जोहरा सय्यद, डॉ. संदेश शहा, खंडेराव सोनवले, जनार्धन क्षीरसागर, भारत शेलार, भालचंद्र मखरे, सादिक मोमीन, महादेव इंगळे यांच्या हस्ते व वतीने चिंच जांभूळ, वड, करंज, बहावा, बांबू अशी ३०० झाडे लावण्यात आली. यावेळी इंदापूर शहरात १२०० झाडे लावून त्याची देखभाल करणारे वृक्षमित्र वासुदेव शिरसट, चंद्रकांत देवकर, अशोक चिंचकर यांचा सत्कार झाला.

श्री. गारटकर पुढे म्हणाले, या विद्यालयास मजबूत संरक्षक भिंत, आधुनिक व्यासपीठ, मैदान, बहुद्देशीय सभागृह यासाठी सहकार्य केले जाईल. माजी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संतुलन तसेच विविध पक्ष्यांसाठी घनदाट वन योजनेचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे,त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.यावेळी विद्यालय हरित सेनेचे सुनील मोहिते, नितीन मदने तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT