इंदापूर, ता. २० : दरोडा टाकण्याच्या तयारीत चारचाकी वाहनातून पिंपरी बुद्रुक ते नीरा नरसिंहपूर मार्गावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तलवार, कटावणी, पक्कड यांसह दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सव्वा ते पावणेदोनच्या सुमारास पोलिसांची रात्रगस्त सुरू होती. या वेळी एक मोटार (एमएच १४ एएम ९११९) संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी दिली. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी पिंपरी बुद्रुक ते नीरा नरसिंहपूर मार्गे संगम पुलाच्या पुढील भागात वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तलवार, कटावणी तसेच पक्कड आढळून आली. पोलिसांनी गोविंद संजू काळे (रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यासोबत सुभाष राजू चव्हाण, कुणाल परशुराम काळे, कालू शंकर पवार आणि राहुल रमेश चव्हाण (सर्व रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असल्याचे समोर आले. पोलिस हवालदार महेश दत्तात्रेय गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, या संशयितांचा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने वाहनात घातक शस्त्रे व चोरीसाठी लागणारे साहित्य ठेवून दरोडा टाकण्याची पूर्वतयारी केल्याचा संशयातून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चेके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.