इंदापूर एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया Sakal
पुणे

इंदापूर : एस. बी. पाटील महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा कायम.

एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली.

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर नजीक वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचालित एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली. यामध्ये इन्फोसिस,कॅन्गीझंट, कॅपजेमिनी, एमडॉक्स, टीसीएल, बॉश, भारत फोर्ज, वालचंद इंडस्ट्रीज, फोर्ब्ज मार्शल, जॉन डिअर, जाबिल सर्किट प्रा. लि., टाटा स्टील, टाटा इलेक्ट्रिकल प्रा. लि. वेरॉक इंजिनीरिंग ली.,कमिन्स,लोकेश मशिन लि., लुकास टी. व्ही. एस. प्रा. लि., अल्मायटी असिलरी प्रा. लि., अशा विविध कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.टी. शिरकांडे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,सचिव सौ. भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील आणि विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे म्हणाले, महाविद्यालयाचा नामांकितकंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्णशिक्षणा बरोबरच विविध विषयांचे प्रशिक्षण तसेच प्लेसमेंटमध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. यावर्षीही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा जपत अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्याविद्यार्थ्यांचा नामांकित कंपन्यांत झालेली निवडअभिनंदनीय आहे. विद्यार्थ्याना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्याप्रोजेक्ट बेस्ड लर्निंग चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत असून महाविद्यालयाच्या इंटप्रिन रशिप डेव्हलपमेंट सेल अंतर्गतही विद्यार्थ्याना करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विविधशाखांशी निगडीत कंपन्या ऑनलाईन प्लेसमेंट डाइव्ह आयोजित करण्यात आघाडीवर असूनकम्पुटर ,इलेक्ट्रोनिक्स,मेकॅनिकल,सिव्हिल,इलेक्ट्रिकल या क्षेत्रात सध्या व्हर्च्युअल मुलाखत आणि फोनवर मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होत आहेत.

ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. पी. कांबळे म्हणाले,प्लेसमेंट कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झालेल्या नाहीत. कम्पुटर, इलेक्ट्रोनिक्स या क्षेत्रात सध्या व्हर्च्युअल मुलाखती आणि टेलेफोनिक मुलाखती मघून प्लेसमेंट होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल डेव्ह लपमेंट, फॉंरेन लँग्वेज कोर्सेस, ऍप्टीट्युड टेस्ट, मॉक इंटरव्यू असे विविध उपक्रम नेहमी राबविले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT