पुणे

महिलेचे दागिने पळविणाऱ्याला पळसदेव ग्रामस्थांनी पकडले

CD

इंदापूर, ता. १४ : पळसदेव (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (ता. १४) दुपारी चहाच्या टपरीवर आलेल्या दोन चोरट्यांनी ६० वर्षीय महिलेला धमकावून ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. ग्रामस्थांनी पाठलाग करून एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी जफर अब्बास उर्फ हसन अलीरजा इराणी आणि हैदर सलीम इराणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगम शहाजहान शेख (वय ६०) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगम शेख या पळसदेव-डाळज मार्गावरील आपल्या चहाच्या टपरीवर पतीसह असताना दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी ‘गुटखा विकता का?’ अशी विचारणा केली. त्यानंतर ‘साहेबांची गाडी येत आहे, दागिने काढून ठेवा’ असे धमकावून शेख यांच्या हातातील सोन्याची फुले आणि मंगळसूत्र (एकूण ८ ग्रॅम) हिसकावून घेतले. आरोपी पळून जात असताना दुचाकी घसरल्याने जफर इराणी याला नागरिकांनी पकडले, तर हैदर इराणी पसार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT