shrinivas pawar sakal
पुणे

Shrinivas Pawar : इंदापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी श्रीनिवास पवारांकडे...

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभेच्या निवडणूकीच्या पाश्‍ र्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी श्रीनिवास पवार यांच्यावरती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभेच्या निवडणूकीच्या पाश्‍ र्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी श्रीनिवास पवार यांच्यावरती दिली आहे. पवार लवकरच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असून संपुर्ण तालुका पिंजुन काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी दिली.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांचे शेतकऱ्यांशी व नागरिकांशी सलोख्याचे संबध आहेत. शर्मिला पवार यांनी शरयू फाउंडेशनच्या माध्यमातुन अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत.

सध्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यासह इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी इंदापुर तालुका पिंजुन काढत असून शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवत आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारास आत्तापासुनच रंगत आली आहे. गावभेटी,घोंगडी बैठका घेण्यास सुरवात झाली आहे.

श्रीनिवास पवार यांच्याकडे इंदापूर तालुक्याची जबाबदारी दिली आहे. श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार ही अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत. यासंदर्भात तालुकाध्यक्ष अॅड.तेजसिंह पाटील यांनी सांगितले की, श्रीनिवास पवार यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेचा दांडगा संपर्क आहे. लवकरच ते इंदापूर तालुक्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असून गावोगावी नागरिकांना भेटणार आहेत. सध्या पक्षाचे चिन्ह (तुतारी वाजविणाऱ्या माणूस) आम्ही मतदारापर्यंत पोहचवित असून पवार साहेबांचे विचार जनतेला पटवून सांगत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT