walachandnagar
walachandnagar 
पुणे

इंदापूरतील तलावात पाणी सोडण्यास चालढकल कशासाठी

राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी या तिन्ही गावाची लोकसंख्या 7103 असून जनावरांची संख्या 9919 आहे. या गावातील पाणी पुरवठा योजना वाघाळे तलावरती अवलंबून असून तलावामध्ये पाणी सोडल्यास तिन्ही गावाचा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातुन तलावामध्ये पाणी सोडल्यास सुमारे 7 लाख 70 हजार रुपयांचा पाणीपट्टीसहित खर्च अपेक्षीत आहे.

तलाव एकदा भरल्यास सुमारे चार ते पाच महिने पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. तलावामध्ये पाणी न सोडता तिन्ही गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केल्यास जून महिन्यापर्यंत सुमारे २ कोटी ६० लाख रुपयापेक्षा जास्त खर्च होणार अाहे. अशीच परस्थिती तालुक्यातील सगळ्या गावांची असुन तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी प्रशासन चालढकल का करत आहे ? याचे कोडे सर्वसामान्य नागरिकांना सुटेनासे झाले आहे. 

चालू वर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली असल्याने तालुक्यामध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी व ग्रामस्थांना आत्तापासुन पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावातील पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. तसेच अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती असल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. नीरा खोऱ्यातील धरणामध्ये मुबलक पाणी साठा असुन सध्या नीरा डाव्या कालव्याचे शेतीसाठी पाण्याचे आवार्तन सुरु आहेत.हे आवर्तनाबरोबर गावोगावोचे पाण्याच्या तलावामध्ये पाटबंधारे विभागाला सहज पाणी सोडता येणे शक्य आहे. अनेक ग्रामपंचायतींनी मागणी करुन पाणी सोडले जात नसल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार असल्याचे संकेत आत्तापासुन मिळत आहे. 

यासंदर्भात निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी ग्रामपंचायतीने तहसीलदार व पाटबंधारे विभागाला लेखी पत्र देवून तलावामध्ये पाणी सोडल्यास शासनाचा भविष्यात टॅंकरवरती होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचणार असल्याने कळवून ही पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पाणी सोडण्यास चालढकल का करीत आहे याचे कोडे सुटेनासे झाले असुन पाण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होवू लागले आहेत.इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असुन जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न ही भविष्यात गंभीर होणार आहे.

जून 2018 अखेर पाण्याचे नियोजन व होणारा खर्च
गावाचे नाव - निरवांगी,दगडवाडी,सराफवाडी
लोकसंख्या - 7103
जनावरांची संख्या - 9919
माणसांसाठी लागणारे पाणी : 2 लाख 84 हजार 120 लिटर.
जनावरांसाठी लागणारे पाणी : 3 लाख 96 हजार 760 लिटर.
टॅंकरची एकून संख्या : 55 
टॅंकरने पाणी पुरवठा केल्यास येणार खर्च : 2 कोटी 60 लाख रुपये
निरा डाव्या कालव्यातुन वाघाळे तलावामध्ये पाणी सोडल्यास येणार खर्च - 7 लाख 70 हजार रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT