संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता.१४ : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे इंदापूर तालुक्यातील पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सध्या तरी तालुक्यातील एकमेव कळस गावासाठी टँकर सुरू आहे. इतर पाच गावांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.
आगामी काळात काही गावांमधून टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने टंचाईच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत.
सध्या कळसगावासाठी टँकर सुरू असून अनेक भागात पाणीटंचाई भासत असलेल्या नवीन गावांकडूनही टँकरसाठी मागणी वाढ होणार आहे.
या गावांसाठी प्रस्ताव
चाकाटी, वकील वस्ती शेटफळगडे, लुमेवाडी व बावडा या
इंदापूर तालुक्यात उजनी धरणामुळे बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण नाही मात्र ज्या भागात अडचण आहे त्या ग्रामपंचायतीकडून मागणी आल्यास तात्काळ टँकरबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल सध्या तालुक्यात फक्त एक टँकर सुरू असून पाच गावांची मागणी आहे.
- सचिन खुडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, इंदापूर
इंदापूर तालुक्यात ज्या गावांकडून टँकरची मागणी येत आहे, तिथे तातडीने आवश्यकतेनुसार शासकीय पातळीवर पूर्तता करीत पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
- प्रशांत गावंडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती इंदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.