पुणे

संसाराचा गाडा हाकायला ‘उमेद’ची साथ

CD

पळसदेव, ता. ७ ः गृहिणी म्हणून दिवसभर घरकामात राबणाऱ्या इंदापूर तालुक्यातील ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. महिला स्वयंसहायता बचत गट सदस्य झाल्यानंतर प्रपंचाचा गाडा हाकताना पै-पै जमविलेली रक्कम गटात जमा केली. मग बँकेतून बचत गटाला लाखोंचे कर्ज मिळाले. यातून घर सांभाळणाऱ्या महिला उद्योजिका झाल्या आहेत. अर्थात यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ म्हणजेच उमेदचा या बचत गटांना मोठा आधार व मार्गदर्शन मिळाले आहे. यातून सुमारे ५३२० महिलांनी आर्थिक गुलामगिरी झुगारून स्वावलंबनाकडे यशस्वी पाऊल टाकले आहे. परिणामी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यात तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे.

कृषी, अकृषी व इतर पूरक व्यवसायांच्या माध्यमातून उत्पन्नवाढ साधत महिला स्वावलंबी झाल्या आहेत. या उपक्रमांमुळे तालुक्यातील ११६ गावांतील सुमारे ५३२० महिलांना थेट स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या या महिला बचत गटांना उमेदने चांगले बळ दिले आहे. चालू आर्थिक वर्षात विविध बँकांच्या माध्यमातून ७५५ बचत गटांना सुमारे ३७.३० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच २२१० बचत गटांना ३.३१ कोटी रुपयांचा फिरता निधी (अनुदान) वितरित करण्यात आला आहे. तर १३०४ गटांना ७.८२ कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात महिलांच्या दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. छोट्या-मोठ्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून राहावे लागणाऱ्या महिलांना आज उमेदमुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याबरोबर, कुटुंबाला हातभार लावण्याची संधी प्राप्त झाली आहे. जिथे नोकरीची संधी नाही तेथे स्वयंरोजगाराची निर्मिती करून महिला कमावत्या झाल्या आहेत.
प्रकल्प संचालिका शालीनी कडू व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने तालुका कायम एक पाऊल पुढे राहिला आहे.

‘‘शेतकरी व महिला गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने तालुक्यात ११ ठिकाणी ‘पुण्यश्री सुपर मार्केट’ सुरू करण्यात आले आहेत. या सुपर मार्केटमध्ये बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने, महिलांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.’’
-सचिन बाबर, व्यवस्थापक, उमेद अभियान

‘‘उमेदच्या माध्यमातून पुणे विमानतळावर कापडी बॅग विक्री स्टॉल उभारला असून, यामध्ये गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी बॅग विक्री केल्या जातात. पाच रुपयांपासून ते आठशे रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय काही दुकानदार व वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावून कापडी पिशव्या विक्री करतो. माझ्यासह अन्य २० ते ३० महिलांना या व्यवसायातून रोजगार प्राप्त झाला आहे.’’
-कल्पना धोत्रे, सणसर, कापडी पिशवी निर्मिती व्यवसाय


‘‘सुरुवातीला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून ऑइल मिल सुरू केली होती. यानंतर उमेदच्या माध्यमातून बचत गटाला मिळालेल्या कर्जातून डाळ मिल, शेवई मशीन, पापड मशीन, भुसार धान्य स्वच्छ करण्याच्या मशीन, भुईमूग शेंगा फोडण्याचे मशीन, धान्य दळून देण्याच्या तीन पीठ गिरणी, गहू चिक काढण्याची मशीन यांसारख्या मशिनरी खरेदी करून व्यवसाय वाढविला आहे. पूर्वी घर व शेतीत राबणारे हात आता व्यवसायात राबत आहेत. यातून दररोज हक्काचे चार ते पाच हजार रुपये मिळू लागले आहेत.’’
-अनुजा काळे, पळसदेव, डाळ मिल

आकडे बोलतात...
२७७६
तालुक्यातील बचत गट
--------------------------
२५,४६८
महिला सदस्या एकत्र
-------------------------
१२
उत्पादक गट कार्यरत
-----------------
३२११
विविध प्रकारच्या व्यवसायांची उभारणी

03407

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT