sakal
पुणे

इंदापूर : RTI मुळं त्रस्त झालेल्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरु

डॉ. संदेश शहा

इंदापूर : जोपर्यंत जनहिताऐवजी वैयक्तिक माहिती अधिकार वापरून इंदापूर पंचायत समिती कामकाजात अडथळा आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

यामधून अत्यावश्यक सेवा, घरकुल आदींना वगळण्यात आले आहे मात्र या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे असल्याने सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये लक्षघालून जनतेसाठी कामबंद आंदोलन थांबवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेले काही दिवस पंचायत समितीच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत. वारंवार माहितीचा अधिकार, उपोषण याद्वारे तेच-तेच लोक कोणतेही जनहित नसताना त्रासदेण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये काही सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. माहिती एकच मात्र ती विविध माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मागवून मुद्दाम त्रास दिला जातो.

त्यामुळे चांगले कामकरून देखील इंदापूर तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत यांचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत कामकाज बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. तसेच जाणूनबुजून माहिती मागविणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दाद मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचे अस्त्र दिले मात्र त्याऐवजी कामे होण्याऐवजी त्याचा काही जणांनी व्यवसाय केला आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यास शिक्षेस पात्र करावे अशी मागणी शासकीय कर्मचारी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT