Pune Crime 
पुणे

Pune Crime: सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना; पॉर्न व्हिडिओ दाखवत 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

Pune Crime Latest News: पुण्यातील कोंढवा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. पिढीत पाच वर्षीय मुलगा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार केल्याची माहिती आहे.

कार्तिक पुजारी

Pune Crime: पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. शहरातून सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना समोर आली आहे. पाच वर्षाच्या अल्पवयीन बालकासोबत तीन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक कृत्य केलं आहे. पॉर्न व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. पिढीत पाच वर्षीय मुलगा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार केल्याची माहिती आहे. संतापजनक म्हणजे पिढीत पाच वर्षीय बालकाच्या मोठ्या भावासमोर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले आहे. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

पुण्यातून दररोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी बोपदेव घाटामध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत हा भयानक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी तीन आरोपी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांनी त्यांचे स्केच बनवले असून शोध सुरु आहे.

पुण्याला क्राईम सिटी म्हणता यावी इतके गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आकडेवारीनुसार, पुण्यामध्ये गेल्या सात महिन्यामध्ये २६५ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याचा अर्थ पुण्यात दररोज सरासरी एकापेक्षा जास्त बलात्काराच्या घटना घडत आहेत. ही गंभीर बाब आहे. लोकांकडून देखील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपींवर वचक बसावा अशा प्रकारची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : दिल्ली पोलिसांचे कारस्थानपूर्ण वर्तनही यातून उघड होते - पप्पू यादवांचे वकील

Omraje Nimbalkar यांना प्रमुखांचा मान, Ranajagjitsinha Patil डावलल्याची चर्चा, भाजपात खळबळ | Dharashiv

Abhishek Sharma: २५ षटकार, १५ चौकार अन् २३३ धावा... अभिषेक शर्माचं वादळी द्विशतक; पाहा Video

IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

SCROLL FOR NEXT