15th august 1947 shaniwar wada nana patil pune celebration  esakal
पुणे

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा? फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

Independence Day 15 August 1947 Pune History: 15 ऑगस्ट 1947 ला प्रदीर्घ संघर्षानंतर ब्रिटिश वसाहतींपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं.

राहुल शेळके

15 August 1947 Pune History: भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसासाठी भारताच्या अनेक वीर सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले होते आणि 150 वर्षांहून अधिक काळ भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना गुडघे टेकायला लावले होते.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला प्रदीर्घ संघर्षानंतर ब्रिटिश वसाहतींपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या दिवशी देशभरातील अनेक संस्था आणि प्रतिष्ठित इमारती राष्ट्रध्वजाच्या रंगात उजळून निघतात.

जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री राष्ट्रपती भवनातून दिलेले पहिले भाषण आजही लोकांच्या स्मरणात आहे.

15 ऑगस्ट 1947 ला पुण्यात काय घडलं होतं?

स्वातंत्र्याचे पुण्यात जंगी स्वागत झाले होते. लक्ष्मीरोड, बुधवार रोड, शिवाजीनगर रोड, स्टेशनरोड भागातील रस्त्यांवर कमानी उभारून व पताका लावून सुशोभित करण्यांत आले होते. कित्येक भव्य कमानींवर "हिंदुस्थान आज पासून स्वतंत्र झाला," "हिंदी स्वातंत्र्याचा विजय असो," ''स्वातंत्र्य चिरायू होवो," "जय हिंद" असे फलक लावण्यात आले होते.

हे फलक काही ठिकाणी रंगांनी तर काही ठिकाणी विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांची आणि फुलांनी सजवले होते. शहर-उपनगर भागात तीन दिवस रात्रंदिवस रोषणाई केली होती. पुणे नगर- पालिकेने शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, नगरपालिका या प्रमुख इमारतींवर दिव्यांची रोषणाई केली होती.

शिवाय सिनेमा, नाट्यगृहे, दुकाने, बँका, सरकारी व बिनसरकारी कार्यालये इत्यादी इमारतींवर कमीअधिक प्रमाणात दिव्यांची सजावट करण्यात आली होती.

पुण्यात कोणी केलं झेंडा वदन ?

पुण्यात रात्री १२ वाजता कलेक्टर कचेरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला होता तर शनिवार वाड्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. एकेकाळी याच पुण्यात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवून देशातील अखेरच्या बलशाली साम्राज्याचा अस्त केला होता. भारताच्या ब्रिटिशराजची ही सुरवात मानली गेली होती. प्रतिसरकारच्या नाना पाटलांनी शनिवार वाड्यात तिरंगा फडकवून ब्रिटिश सत्तेच्या शेवटाचे वर्तुळ पूर्ण केले.

स्वातंत्र्यानिमित्त फुकट चहा

15 ऑगस्ट 1947 ला जनतेतील उत्साह अपूर्व होता. या आनंद उत्सवानिमित्त काही दुकानांनी मोफत इस्त्री करण्याचे तर काही फोटोग्राफर्स फुकट फोटो काढून देण्याचे जाहीर केले होते. काही हॉटेलवाल्यांनी फुकट चहा देण्याचे, तर काही गिरणीवाल्यांनी दळण फुकट दळून देण्याबद्दलच्या पाट्या लावल्या होत्या.

सिनेमा थिरटमध्ये प्रेक्षकांना पेढे व नारळ वाटप

सिनेमा थिरटरात प्रेक्षकांना पेढे वाटण्यात आले होते. सर्व लहान मोठया शाळा- काॅलेजातून हा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला होता. लहान मुलांची कवायत, खाऊ वाटणे, सभा-मिरवणुकी इत्यादी कार्यक्रम ठरविले होते.

व्यापारी वर्गातील उत्साह होता. आपापल्या भागात गोरगरिबांना अन्न देणे, सत्यनारायण, गायन, सभा, कीर्तन, प्रवचन, भजन असे विविध कार्यक्रम केले जात होते. शनिवारवाड्यापुढे शंभर फूट उंचीच्या खांबावर नवा राष्ट्रध्वज फडकवला होता. येरवडा तुरुंगातून 630 कैद्यांना बंधमुक्त करण्यात आले होते. या कैद्यांत राजकीय व सामाजिक गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेले कैदी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

PCMC News : डिजिटल पेमेंट सुविधेअभावी नागरिक त्रस्त, महापालिका रुग्णालयांत रोख रक्कम बाळगणे भाग; उपचारांत विलंब

Ravet Pollution : रावेत, आकुर्डीत धूलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्राधिकरण, निगडी, किवळे भागांतही त्रास, आरोग्यावर दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT