Ajit Pawar, Chandrakant Patil Sakal
पुणे

Independence Day: पुण्यात कोणाचीच दादागिरी नाही; जाणून घ्या कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वाजारोहणाच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. त्यानुसार, दोन जिल्ह्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यात पुणे शहराचाही समावेश असून इथं कोणाचीच दादागिरी चालणार नाही. कारण राज्यपालांच्या हस्तेच पुण्यात ध्वजारोहण केलं जाणार आहे. (Independence Day 2023 Pune official flag hoisting Ajit Pawar Chandrakant Patil governor Ramesh Bais)

शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार, १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिन विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार, विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि कोकण यांनी आपापल्या विभागातील विभागीय तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

काय झालाय नवा बदल?

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. पण अजितदादा सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर पुण्यात कोण ध्वजारोहण करणार? यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. पण काल समोर आलेल्या यादीनुसार चंद्रकांत पाटीलच पुण्यात ध्वजारोहण करतील.

पण आता यात बदल झाला असून ना चंद्रकांत पाटील आणि अजित पवार तर राज्यपाल ध्वजारोहण करणार आहेत. तसेच रायगड इथं जिल्हाधिकाऱ्यांऐवजी चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत. तर अजित पवार हे कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहेत.

उर्वरित जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

  1. नागपूर - देवेंद्र फडणवीस

  2. अमरावती - छगन भुजबळ

  3. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार

  4. वाशिम - दिलीप वळसे-पाटील

  5. अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील

  6. धुळे - दादाजी भुसे

  7. जळगाव - गुलाबराव पाटील

  8. ठाणे - रविंद्र चव्हाण

  9. सोलापूर - हसन मुश्रीफ

  10. सिंधुदुर्ग - दिपक केसरकर

  11. रत्नागिरी - उदय सामंत

  12. परभणी - अतुल सावे

  13. औरंगाबाद - संदीपान भुमरे

  14. सांगली - सुरेश खाडे

  15. नंदुरबार - विजयकुमार गावित

  16. उस्मानाबाद - तानाजी सावंत

  17. सातारा - शंभुराज देसाई

  18. जालना - अब्दुल सत्तार

  19. यवतमाळ - संजय राठोड

  20. बीड - धनंजय मुंडे

  21. गडचिरोली - धर्मराव अत्राम

  22. मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा

  23. लातूर - संजय बनसोडे

  24. बुलढाणा - अनिल पाटील

  25. पालघर - आदिती तटकरे

  26. हिंगोली - जिल्हाधिकारी

  27. वर्धा - जिल्हाधिकारी

  28. गोंदिया - जिल्हाधिकारी

  29. भंडारा - जिल्हाधिकारी

  30. अकोला - जिल्हाधिकारी

  31. नांदेड - जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT