पुणे

दापोडीत एकतेची तिरंगा फेरी

CD

पिंपळे गुरव, ता. १६ ः दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी आणि सांगवी परिसरात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दापोडी येथे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या वतीने एकतेची तिरंगा फेरी काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी शहर सुधार समितीचे अध्यक्ष संजय काटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मौलाना कारी इक्बाल साहब, अफरोज अन्सारी, फादर डेव्हिड काळे, वैशाली शेळके, राजश्री बाईत आदी उपस्थित होते.

दापोडी पोलिसांकडून ध्वजवंदन
सहाय्यक पोलिस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्यात ध्वजवंदन करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अति उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किरण शेळके, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पवळे, विलास पवार आदी उपस्थित होते.

सीएमई प्रवेशद्वारासमोर अभिवादन
‘सगळ्यांचा राजा मित्र मंडळा’च्या वतीने सीएमई गेटसमोर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी आनंद कांबळे, सतीश घोलप, महावितरणचे अनिल मुलगीर, संजय बाराहते, पुणे जिल्हा मुष्टियुद्ध असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शिरोळे, युवराज दिसले, विजय शिंदे, लक्ष्मीकांत बाराथे आदी उपस्थित होते. दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी परिसरातील हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर, जनता शिक्षण संस्था, एस. बी. पाटील शाळेसह विविध शाळांमध्ये तसेच सामाजिक मंडळांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT