पुणे

सामाईक सातबारा असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र नुकसानभरपाई द्या! : अॅड. सचिन देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

CD

PNE26W63364
सोलापूर : येथे सामाईक सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्रपणे मदत द्यावी, याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याशी चर्चा करताना माजी जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख.
---
सातबाऱ्याचा अडसर नको;
मदतीत शेतकऱ्यांना न्याय द्या
ॲड. देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १ : दुष्काळामुळे खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत सामाईक सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्रपणे द्यावी. स्वतंत्र सातबारा नसल्याच्या कारणास्तव प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामाईक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ देताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक गावांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची नावे एकाच सातबारा उताऱ्यावर आहेत. प्रत्यक्षात जमिनीचे वाटप होऊन प्रत्येकजण स्वतंत्रपणे शेती करीत आहे. अशा परिस्थितीत मदतीचा लाभ एकाच खातेदाराला मिळून अन्य पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे सामाईक खात्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्यक्ष कसणीत व हक्काच्या क्षेत्रानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्रपणे मदत द्यावी. याबाबत महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात. मदतीचा लाभ शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पोचण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Vadgaon Anand Bypass Theft News : पुणे-नाशिक महामार्गावर ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update : बिहारमध्ये आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच दोन अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; विधान परिषदेत विरोधकांना मोठा धक्का

Spiritual Leadership: राजयोगी ब्रह्माकुमार दशरथभाई भागवत यांना राष्ट्रीय अध्यात्म नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT