Hospital 
पुणे

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करण्याच्या विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे. त्यादृष्टीने सरकारी आणि खासगी रुग्णालयांची माहिती घेण्यात येत आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाचाही समावेश आहे.

मुंबई आणि पुणे हे कोरोना उद्रेकाचे हॉटस्पॉट ठरले असून रुग्णांच्या संख्येचा आकडा वेगाने वाढत आहे. दगावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

पुण्या-मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील खासगी रुग्णालयांमध्येही करोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. समान्य रुग्ण आणि कोविड-१९ विषाणूंचा ससंर्ग झालेले रुग्ण एकाच रुग्णालयात नको, असा विचार पुढे येत आहे. भविष्यातील रुग्णसंख्येचा विचार करून कोरोनाबाधीतांवर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय असावे, असेही सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचा प्रस्ताव आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गचा धोका कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

इटलीमध्ये एकाच रुग्णालयात इतर आणि कोरोनाच्या रुग्णांवर उपचार झाल्याचा प्रकार झाला असल्याचे अभ्यासातून समोर आले. ती चूक टाळण्यासाठी, तसेच या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे जावे. त्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल असावे, असा विचार पुढे आला.

त्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयाची माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाचा देखील समावेश आहे. या रुग्णालयातील अन्य आजाराचे रुग्ण दुसरीकडे हलविण्यात येऊन त्या ठिकाणी केवळ कोविड-१९ च्या रुग्णांसाठी ते रुग्णालय राखीव ठेवण्याचा विचार सुरू आहे. पुणे शहरातील ससून प्रमाणेच मुंबई विरार येथील एक रुग्णालय कोविड-१९ साठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Number Plate Tampering Toll Fine : वाहनधारकांनो सावधान ! महामार्गावर नंबर प्लेट लपवून टोल चुकवणे पडणार महागात; सरकार घेणार मोठा निर्णय

Solapur News: शाळेच्या दाखल्यांवरील क्रमांक दुसऱ्यांच्याच नावावर! मोहोळ पंचायत समितीच्या कोमल डोकेंचे कुणबी प्रमाणपत्र बनावट

Latest Marathi News Live Update : सागावात मारामारी; सात जणांवर गुन्हा

IPL 2027 Auction : वीरूचा मुलगा आर्यवीर सेहवाग आयपीएल लिलावात उतरला! पण, द्रविडच्या लेकाने दूरूनच नमस्कार केला... बेस प्राईज किती?

कॅफेतील सहकाऱ्यांनीच २२ वर्षीय तरुणीवर केला अत्याचार, पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत कृत्य; तिघांना अटक

SCROLL FOR NEXT