arvind kejriwal sakal
पुणे

India Aghadi : 'इंडिया आघाडी'च्या धास्तीने भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू

कारवाईला शरण न जाता भाजप विरुद्ध खंबीरपणे लढा देण्याचा 'आप'चा निर्धार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आप व काँग्रेसमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यावर आली आहे. त्यावरून गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपकडून अरविंद केजरीवाल यांना सीबीआय किंवा ईडी मार्फत अटक करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप "आप" च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पत्रकार परिषदेसाठी राज्याचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव, अक्षय शिंदे, किरण कद्रे, निरंजन अडागळे व अमोल काळे उपस्थित होते. किर्दत म्हणाले, 'आप व काँग्रेस यांची आघाडी होणार नाही, अशी समजूत करून घेत भाजपने केजरीवाल यांना यापूर्वी इडी मार्फत नोटीस बजावत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आता आप व काँग्रेस यांच्यासह इंडिया आघाडीत जागा वाटप झाल्याची चर्चा सुरू आहे. बहुतांश राज्यात जागा वाटपाची अधिकृत घोषणा ही केली जाईल. हे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आता अरविंद केजरीवाल यांना केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडून अटकेची कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आमच्या राज्य व देश पातळीवरील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. हा लोकशाही विरोधी आहे. त्याविरुद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढल्याशिवाय राहणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून नागरिक दाखल

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

Ajit Pawar Death : अजून विश्वास बसत नाही, सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील श्रद्धांजलीच्या फोटोसह ठेवलं स्टेटस

Baramati Plane Crash : 'ट्रॅक्टरला दोरी बांधून विमानाचे अवशेष बाजूला केले अन् उर्वरित तीन मृतदेह बाहेर काढले'; प्रत्यक्षदर्शीने सांगितली संकटाची कहाणी

Latest Marathi News Live Update : पुण्याहून कर्नाटकात जाणारा ८३ किलो गांजा पकडला

SCROLL FOR NEXT