पुणे

नेपाळला भारताकडून मदत सुरूच

CD

नेपाळला भारताकडून मदत सुरूच
नवी दिल्ली : पूरग्रस्त नेपाळच्या मदतीसाठी भारताने आणखी ३७.५ टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) साहित्य पाठविल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी समाजमाध्यमावर दिली. औषधे, अन्नाची पाकिटे आणि एचएडीआर साहित्य घेऊन दुसरे विमान नुकतेच रवाना झाले, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी भारताचा सातत्याने संपर्क असून, मदतकार्याला भारताकडून पाठिंबा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिबेट सीमेलगतच्या भागात आलेल्या भीषण अचानक पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान १६० जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही तासांतच भारताने मदतीची पहिली खेप पाठविली होती. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. पहिल्या टप्प्यात तात्पुरते निवारे, ब्लँकेट, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले. येत्या काही दिवसांत भारताकडून आणखी मदत पाठविली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT