टिळक चौक - हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे स्वागत भाजपने केले. त्या वेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळताना कार्यकर्ते.
टिळक चौक - हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे स्वागत भाजपने केले. त्या वेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळताना कार्यकर्ते. 
पुणे

Indian Air Strike : हवाई हल्ल्यांचे शहरात स्वागत

सकाळवृत्तसेवा

पुणे - भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करून ते नष्ट केले. याबद्दल विविध संस्था, संघटनांनी फटाके फोडून, मिठाई वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहरामध्ये जल्लोष साजरा केला.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी या हल्ल्याचे स्वागत करून लष्कराचे अभिनंदन केले. देशात दहशतवादी कट रचणाऱ्या ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेचे तळ हवाई दलाने उद्‌ध्वस्त केल्याबद्दल हवाई दलाचे अभिनंदन खासदार अनिल शिरोळे यांनी केले. पुलवामातील भारतीय जवानावर केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतल्याचे शिरोळे यांनी सांगितले. 

भाजपच्या कसबा मतदारसंघातील टिळक चौकात विजयोत्सव साजरा झाला. पाकिस्तानचा ध्वज व पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, राजेश येनपुरे, हेमंत रासने, छगन बुलाखे, प्रमोद कोंढरे, राजू परदेशी, वैशाली नाईक, संजय देशमुख आदी उपस्थित होते. भाजपच्या अल्पसंख्याक विभागातर्फे स्वारगेट येथील जेधे चौकात फटाके फोडून आनंद साजरा केला. 

या वेळी शहराध्यक्ष रफिक शेख, उपाध्यक्ष अस्लम खान, रफिक बागवान, मुस्तफा पटेल उपस्थित होते. हवाई हल्ला करून पुलवामा येथील हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना खरी आदरांजली वाहण्यात आली, असे हिंदू महासभेच्या श्रीकांत ताम्हनकर यांनी सांगितले.

महासभेतर्फे सारसबागेजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विद्याधर नारगोळकर, संजय वैशंपायन, संजय ठकार, शुभांगी आफळे उपस्थित होते. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागात नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी रहिवाशांना पेढे वाटून जल्लोष केला. सामाजिक समरसता मंचातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. हवाई हल्ल्यांचेही स्वागत केले. 

भारतीय हवाई दलाने हल्ले करून देशाची क्षमता जगाला दाखवली आहे. जवानांच्या अतुलनीय शौर्याला मी सलाम करतो. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT