पुणे

भारत डिजिटल व्यवहारांत अग्रस्थानी

CD

पुणे, ता. २१ : भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे निम्मे व्यवहार भारतात होत आहेत. ‘यूपीआय’च्या माध्यमातून २०२५-२६ मध्ये सुमारे २४० अब्ज व्यवहार झाले. भारताचे डिजिटल व्यवहाराचे मॉडेल जगासाठी आदर्श ठरत असल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.
ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त या ब्रिक्स सदस्यांच्या दूरसंचार मंत्र्यांची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत डिजिटल कनेक्टिव्हिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, ६ जी, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल कौशल्यविकास या विषयांवर चर्चा झाली. या क्षेत्रांत ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिंदे म्हणाले, ‘‘भारताने ब्रिक्स देशांसोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची यशस्वी मॉडेल्स सामायिक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दूरसंचार, डिजिटल सुविधा, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ६ जी या क्षेत्रांत संयुक्त प्रशिक्षण व तांत्रिक देवाणघेवाण वाढविण्यात येणार आहे. इच्छुक देशांमध्ये भारताच्या डिजिटल उपाययोजनांचे प्रायोगिक प्रकल्पही राबविले जाणार आहेत. भारतात दूरसंचार क्षेत्रातही मोठी प्रगती झाली आहे. देशातील प्रत्येक गावापर्यत ४ जी सेवा पोहोचली असून, ५जी सेवाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. कमी खर्चात डिजिटल आणि दूरसंचार सेवा उपलब्ध करून देणे हे भारताच्या डिजिटल परिवर्तनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ’’
डिजिटल परिवर्तन हे केवळ वेगवान नव्हे, तर सर्वसमावेशक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत असावे, यावर ब्रिक्स देशांनी बैठकीत भर दिला. नवकल्पनांना चालना देणे आणि नागरिकांची डिजिटल क्षमता वाढविण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे
- सायबर सुरक्षेसाठी सहकार्य वाढविणार
- ६ जी तंत्रज्ञानावर संयुक्त कामकाज
- डिजिटल मॉडेल्सची परस्पर देवाणघेवाण
- डिजिटल ब्रिक्स फोरमला बळकटी देणार
- डिजिटल परिवर्तन सर्वसमावेशक करण्यावर भर
- भारताच्या डिजिटल मॉडेलची जगभर चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT