(धन की बातसाठी लेख)
लोगो- अर्थवेध
इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल
गौरव बोरा
-------------------------------------------------
भारतीय शेअर बाजारात अल्पकालीन चढ-उतार सुरू असले, तरी देशाची आर्थिक ताकद सातत्याने वाढत असल्याचे अनेक निर्देशांक स्पष्टपणे दर्शवत आहेत. ‘इमर्जिंग मार्केट ट्रॅकर’मध्ये भारताने सलग अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्याचबरोबर चार महिन्यांच्या विक्रीनंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जुलै महिन्यात पुन्हा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या दोन्ही घडामोडी भारताच्या दीर्घकालीन विकासकथेची पुष्टी करतात.
भारत पुन्हा इमर्जिंग मार्केटमध्ये अव्वल
देश
कंपोझिट स्कोअर
भारत
८२.२
चीन
७०.२
व्हिएतनाम
६९.८
भारत अव्वल का?
जीडीपी वाढ : ७.८ टक्के
उत्पादन पीएमआय : ५४.२
निर्यातवाढ : १५.५ टक्के
आयात कव्हर : ९.७ महिने
महागाई : ४.४ टक्के
मजबूत आर्थिक धोरणे आणि स्थिर रुपया
चार महिन्यांनंतर ‘एफपीआय’चे पुनरागमन
भारतीय शेअर बाजारातून ‘एफपीआय’नी २०२६ मध्ये आतापर्यंत निव्वळ २.५४ लाख कोटी रुपयांची विक्री केली आहे, जी संपूर्ण २०२५ मधील १.६६ लाख कोटी रुपयांच्या विक्रीपेक्षा अधिक आहे. सलग चार महिने विक्री केल्यानंतर जुलैमध्ये ‘एफपीआय’ने भारतीय शेअर बाजारात २०,२०० कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली.
महिना
एफपीआय फ्लो
मार्च
- १.१७ लाख कोटी
एप्रिल
- ६०,८४७ कोटी
मे
- ३२,९६३ कोटी
जून
- ४९,३४० कोटी
जुलै
+ २०,२०० कोटी
हे परदेशी गुंतवणूकदारांच्या बदललेल्या दृष्टिकोनाचे संकेत आहेत.
‘एफपीआय’ भारताकडे पुन्हा का वळले?
मोठ्या कंपन्यांचे आकर्षक व्हॅल्युएशन
रुपयातील स्थिरता
जून तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगले कॉर्पोरेट निकाल
आयटी, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नफ्यात सुधारणा
जागतिक व्याजदर व भू-राजकीय दबावात काहीशी घट
४. कोणत्या क्षेत्रांना फायदा
बँकिंग आणि वित्तीय सेवा
माहिती तंत्रज्ञान (आयटी)
पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर)
कॅपिटल गुड्स
वाहन आणि वाहनपूरक
उत्पादन
(चौकट करावी)
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?
‘एफपीआय’ची खरेदी हा सकारात्मक संकेत आहे; पण तोच गुंतवणुकीचा एकमेव आधार नसावा.
दर्जेदार लार्ज कॅप आणि निवडक मिड कॅप कंपन्यांवर भर द्यावा.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारताची आर्थिक कथा अधिक मजबूत होत आहे.
"स्लो अँड स्टेडी" हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा गुणधर्म ठरत असून, पुढील दशकात भारत जागतिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता अधिक मजबूत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.