पुणे

कऱ्हाड सदाभाऊखोतप्रेस

CD

निर्यातबंदीमुळे भारताने गमावली जागतिक बाजारपेठ

सदाभाऊ खोत; शेतकरी विरोधी धोरण न राबविण्याचे सरकारला आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. १८ ः वारंवार निर्यातबंदी लावल्यामुळे जागतिक बाजारपेठ गमावण्याचा फटका भारताला बसला आहे, असे मत व्यक्त करून आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकालला घरचा आहेर दिला. निर्यातबंदीचा परिणाम कांदा पिकावर झाला असून, निर्यातबंदीचे हत्यार हे शेतकरी विरोधी आहे, ते सरकारने न वापरणे हाच त्यातील शहाणपणाचा मार्ग आहे, असे स्पष्ट मतही व्यक्त केले. शेतकरी विरोधी धोरणे राबवू नका, हा शेतकरी देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.


येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वारंवार निर्यातबंदी लावल्यामुळे जागतिक बाजारपेठ गमावण्याचा फटका भारताला बसल्याचे स्पष्ट करून आमदार खोत म्हणाले, ‘‘सरकारने कांदा खरेदीसाठीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यातून भाव वाढून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. मात्र, निर्यातबंदीचे हत्यार हे शेतकरी विरोधी आहे, ते सरकारने न वापरणे हाच त्यातील शहाणपणाचा मार्ग आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी शेतकऱ्याला जगाची बाजारपेठ खुली करण्याची गरज आहे.’’

समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘‘उबाठा गट असो किंवा कबाटा असो. ते ज्या काँग्रेसबरोबर, एनडीए सरकारबरोबर गेले त्यांनी ५०-६० वर्षांत शेतीचे वाटोळे केले. ज्यांच्याकडे शेतकरी नेता म्हणून केंद्रातील कृषी खाते दीर्घकालीन होते, त्यांनीही शेतकरी विरोधीच धोरणे राबवली आहेत. लोकसभेत तीन कृषी विधेयके मांडली. त्यावेळी उबाठा गटाने का पाठिंबा दिला नाही? उबाठासह सर्व विरोधी इंडियावादी पक्ष आहेत. त्यांना शेतकऱ्यांचा माल फुकट खायचा कळतो. देशावर सध्या जे संकट आले, त्यातून शेतकरी देशाला बाहेर काढू शकतो. अटलबिहारी वाजपेयी यांनी इथेनॉलचा निर्णय घेतला. त्यानंतर मोदींनी २० टक्के इथेनॉल इंधनात मिश्रीत करण्याचा निर्णय घेतला. तुमचे सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतला नाही? मात्र या देशाला या संकटात कोणी घातले?’’
.................

जयंत पाटलांवर टीका

डिझेल-पेट्रोलचे दर १३० रुपये होणार असे आमदार जयंत पाटील हसत हसत बोलले. २००४ मध्ये जे डिझेल-पेट्रोल ३४ रुपये होते, ते २०१४ ला ७६ रुपये लिटर केले. ४४ लिटर तुमच्या काळात प्रतिलिटर वाढले. २०१४ नंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात फक्त २२ रुपयांनी पेट्रोल-डिझेल वाढले आहे. तुमच्या काळात सर्वाधिक वाढ झाली आहे. जगावर संकट आल्यावर देशाचा प्रमुख कुंटुंबाला सावध करत असेल, तर त्यात गैर काय? असा सवाल करून आमदार खोत यांनी ते अर्थमंत्री होते, त्यांना अर्थ खात्याचा अर्थ काय कळाला? असा सवाल उपस्थित केला.
...............
बच्चू कडू आता आजोळी

आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार खोत म्हणाले, ‘‘आमदार बच्चू कडू यांना ते सासरवाडी मुक्कामाला नाहीत, तर ते आजोळी मुक्कामाला आले आहेत. आजोळची माणस प्रेमाने सांभाळत असतात. आजोळची माया ही वाहत्या गंगेसारखी असते, हे बच्चूभाऊंनना समजलेले दिसत नाही. देवाभाऊ हे प्रस्थापितांच्या विरोधातील विस्थापितांचे नेतृत्व आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचे व्हीजन असलेले नेतृत्व आहे.’’

W20077
सदाभाऊ खोत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘खेलो इंडिया’ची सुवर्णपदक विजेती आता हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’! ‘एएफएमसी’तील तरुणींचा प्रेरणादायी प्रवास

Police Housing: मुंबई पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार! 74 भूखंडांवर नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारणार; सरकारची मोठी घोषणा

Mangalwedha News : उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

Palkhi Sohala : पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर सज्ज!; १५ हजार चौ. फूटांचे जर्मन हॅगर, मोबाईल चार्जिंगपासून महिला वारकऱ्यांसाठी बंदिस्त स्नानगृहापर्यंत सर्व सुविधा

स्मार्ट मीटरमुळे नाही, हिटवेव्हमुळे वीज बील वाढलं; मुख्यमंत्री फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली

SCROLL FOR NEXT