Magarpatta City Sakal
पुणे

Video : पुण्यातील मगरपट्टा सिटी 20 वर्षापूर्वी अशी दिसायची; कसा होत गेला बदल? पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे म्हटलं की आयटी पार्क, कोरेगाव पार्क, मगरपट्टा सिटी, हिंजवडी या महत्त्वाच्या भागांचा उल्लेख केला जातो. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मगरपट्टा सिटी. मगरपट्टा सिटीला अनेक लोकं काही वर्षापूर्वी फॉरेन म्हणून ओळखत होते. तर सध्याच्या परिस्थिती हे खासगी विकसित शहर झाले आहे.

या सिटीमध्ये मॉल, आयटी पार्क, बाजारपेठा, शाळा, दवाखाने अशा सुसज्ज व्यवस्था केलेल्या आहेत. मागच्या २० वर्षापूर्वी मगरपट्टा सिटी कशी दिसायची आपल्याला माहिती आहे का? २० वर्षापूर्वीच्या मगरपट्टा सिटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, २००२ सालापासून या जागेमध्ये कशा पद्धतीने विकास होत गेला आणि आत्ता मगरपट्टा कसा आहे यासंदर्भातील हा व्हिडिओ असून गुगल मॅपच्या साहाय्याने हा व्हिडिओ बनवला गेला आहे.

मगरपट्टा हे मूळ 'मगर' आडनाव असलेल्या समुदायाच्या मालकीचे शेतांचे भूखंड होते. 1982 मध्ये हे क्षेत्र PMC द्वारे फ्युचर अर्बनिझेबल झोन म्हणून निश्‍चित केले गेले, जेणेकरून पुणे महापालिका विकासासाठी जमीन सहजपणे ताब्यात घेऊ शकेल. पण नंतर 123 मगर कुटुंबांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:च्या बळावर जमीन विकसित केली.

त्यासाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आणि प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या जमीनीनुसार त्यात वाटा मिळाला. मगरपट्टा शहर 430 एकर जागेवर वसले आहे. हे आता सुसज्ज आणि विकसित शहर म्हणून मगरपट्टा सिटीची ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT