पुणे

.

CD

विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात
नॉर्वेसोबत पाच करार

पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान धोरणात्मक भागिदारी दृढ

ओस्लो, ता. १९ (पीटीआय) : विज्ञान आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे या दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे भेटीदरम्यान, भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग (डीएसआयआर) आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) स्वच्छ ऊर्जा, भूविज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली.
‘सीएसआयआर’च्या महासंचालक व ‘डीएसआयआर’च्या सचिव एन. कलैसेल्वी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळाने नॉर्वेतील संशोधन, शैक्षणिक व औद्योगिक संस्थांबरोबर करार केले. या सहकार्याचा उद्देश संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणे, संस्थात्मक भागीदारी, ‘स्टार्टअप’चा सहभाग आणि शाश्वत वाढीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे.

संशोधनास प्रोत्साहन
‘डीएसआयआर’, ‘सीएसआयआर’ आणि नॉर्वेच्या रिसर्च कौन्सिल यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, संशोधन, तंत्रज्ञान विकास यांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या चौकटीत संयुक्त कार्यशाळा, सहयोगी संशोधन प्रकल्प आणि जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारे आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

संयुक्त संशोधनाला बळ
‘सीएसआयआर’ने नॉर्वेतील स्टिफ्टेलसन सिंटेफ या संस्थेसोबत २०२६-२०२९ या कालावधीसाठी सहकार्य करार केला आहे. हा करार २०१४ मध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या चौकटीत कार्यरत आहे. या सहकार्याचा भर अर्थव्यवस्था व शाश्वत संक्रमणावर आहे. जैवआधारित प्रक्रिया व साहित्य, नवोन्मेष केंद्रे, महासागर ऊर्जा प्रणाली; तसेच कचऱ्याचे मूल्यवर्धन यांसारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधनाला बळ दिले जाणार आहेत. विविध प्रकल्पांसाठी ‘सीएसआयआर’कडून अंदाजे ३.४१ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: रोहित शर्माचा 'काटा' काढला, सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला... कोण आहे विदर्भचा स्पीडस्टार सौरभ दुबे? Video

Iran-America War: इराणविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम देणाऱ्या विधेयकाला अमेरिकन सिनेटमध्ये मंजुरी; सत्तापक्षाच्या सदस्यांचे विरोधात मतदान

Mumbai -Bangalore New Train : मुंबई -बंगळूर आणखी एक रेल्वे धावणार; सांगली, मिरजेतून प्रवास, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांना फायदा

महाराष्ट्र सरकार आणि रॅपिडोचा ऐतिहासिक करार! कॅप्टन आता 'माहिती दूत' बनणार; नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणार

मोठी बातमी: १७८८ सामन्याचं वेळापत्रक BCCI कडून जाहीर; २३ ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी... जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT