indo pacific sakal
पुणे

Pune News : ‘इंडो पॅसिफिक’मध्ये भारताचे स्थान शोधणे आवश्यक - डॉ. समीर सरन

‘हिंद महासागरातील राजकीय उलथापालथ ही जगाला भेडसावणाऱ्या समस्येतील एक महत्त्वाची समस्या आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - ‘हिंद महासागरातील राजकीय उलथापालथ ही जगाला भेडसावणाऱ्या समस्येतील एक महत्त्वाची समस्या आहे. पूर्वी हिंद महासागर होता, परंतु नवीन राजकीय भूगोल तयार झाल्याने ‘इंडो पॅसिफिक महासागर’ झाला आहे. याद्वारे राजकारणाचा एक नवीन मार्ग तयार झाला आहे.

‘इंडो पॅसिफिक’ हा शब्द वापरण्यास सोपा असला तरी त्याची व्याप्ती खूप विस्तृत आहे. आपण भारतीयांनी त्यात आपले स्थान शोधणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल,’’ असे उद्‌गार ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. समीर सरन यांनी काढले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ व्याख्यानमालेत डॉ. सरन यांचे ‘जी२० भारताचा मार्ग’ विषयावर व्याख्यान झाले. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ‘जी-२०’ जागतिक परिषदेच्या थिंक २० सचिवालयाचे डॉ. सरन हे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, ‘जी २० हे उदयोन्मुख देशांसाठी असणार व्यासपीठ आहे. यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताच्या वतीने जगातील दक्षिण आशियायी देशांचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्यात येत आहे.’

सध्या भेडसावणाऱ्या ‘हिंद महासागरातील राजकीय उलथापालथ’, ‘वास्तव आणि आभासी जग’, ‘माणूस आणि निसर्गातील सुरु असलेले द्वंद्व’ या तीन प्रमुख समस्यांचा डॉ. सरन यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘वास्तविक जग आणि आभासी जग हे आता वेगळे राहिलेले नाहीत. तुमची फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर (एक्स) हँडल हे तुमच्यापासून वेगळे नाहीत. या आभासी जगातील आपला वावर हा आपल्या वास्तवातील जीवनाचा निर्णायक घटक बनला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे.’’

‘माणूस आणि निसर्गातील सुरु असलेले द्वंद्व’यावर बोलताना डॉ. सरन म्हणाले, ‘तीव्र हवामान बदल, दुष्काळ, पूर, जंगलातील आग ही आव्हाने आता जगाच्या प्रत्येक भागात आहेत. प्रत्येकाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोषारोपाचा खेळ खेळण्यापेक्षा सामूहिक यंत्रणेची गरज नितांत आवश्यकता आहे.’

कार्यक्रमात सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे डॉ. संतोष गोपालकृष्णन यांनी सूत्रसंचालन केले. तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT