पुणे

अमेरिकेच्या बंदीची पर्वा न करता भारताची रशियाकडून तेलखरेदी सुरुच, पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती

CD

भारताची रशियाकडून
तेल खरेदी सुरूच

अमेरिकेच्या परवानगीची गरज नसल्याची स्पष्टोक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : अमेरिकेची परवानगी असो वा नसो, भारताने रशियाकडून अखंडपणे कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. अमेरिकेने मुभा दिली किंवा नाही दिली, याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी स्पष्ट केले. 
 अमेरिकेने निर्धारित केलेली कालमर्यादा संपुष्टात आल्यानंतरही रशियाकडून भारताची तेल खरेदी सुरूच आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा देण्यापूर्वी, परवानगी दिल्यानंतर आणि आताही कच्चे तेल खरेदी करणे सुरूच आहे. रशियाकडून तेल खरेदीचा निर्णय हा सर्वस्वी व्यावसायिक हित आणि विवेकावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची कमतरता नाही. यापूर्वीही पुरेशा प्रमाणात तेलाची व्यवस्था वेळोवेळी करण्यात आली आहे, असे सुजाता शर्मा यांनी सांगितले.
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी दिलेल्या परवानगीची मुदत १६ मे रोजी संपली होती. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर पूर्ण बंदी नसली तरी अमेरिकेने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी न करण्याचे भारताला निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आज दैनंदिन पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सुजाता शर्मा यांनी भारताची स्थिती स्पष्ट केली.
‘केप्लर’च्या आकड्यांनुसार मे महिन्यात भारताला रशियाकडून प्रतिदिवस १९ लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा अपेक्षित आहे. शिवाय अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि इराककडून कच्चे तेल उपलब्ध होत असल्यामुळे भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांना मुबलक पुरवठा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT