पुणे

रशिया, युक्रेनबरोबर चर्चा वाढविली

CD

रशिया, युक्रेनबरोबर
चर्चा वाढविली

युद्धातील मध्यस्थीच्या भूमिकेवर जयशंकर यांचे सूतोवाच

नवी दिल्ली, ता. ४ (पीटीआय) : युक्रेन युद्ध संपविण्यासाठी भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी थेट चर्चा वाढविली आहे, असे सांगत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी युक्रेन युद्धातील भारताच्या पुढाकाराचे सुतोवाच केले.
युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी भारताच्या वाढत्या प्रयत्नांविषयी जयशंकर यांनी प्रथमच जाहीर माहिती दिली आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारत चार वर्षांहून अधिक काळ युक्रेन संघर्ष संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडविण्याची भूमिका मांडत आहे. मात्र, काही महिन्यांत भारताने केवळ त्याचा पुरस्कार करण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष सहभाग वाढविला आहे. भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संवाद साधत असून, संघर्षातून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही मुद्द्यांवर काम करीत आहे.

मोदींच्या भूमिकेचा संदर्भ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑगस्ट रोजी बिश्केक येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. ‘‘अंतहीन युद्धाला आता युद्धाच्या अंताची दिशा मिळायला हवी,’’ असे मोदी यांनी त्या वेळी म्हटले होते. जयशंकर यांच्या वक्तव्याच्या काही दिवस आधी मोदींकडे युक्रेन संघर्षावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी ‘चांगल्या कल्पना’ असल्याचे पुतीन यांनी म्हटले होते. त्याचवेळी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रिय सिबिहा यांनी भारतासह चार देशांकडून संभाव्य शस्त्रसंधीबाबत प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले होते.

रशियाशी संबंधांची पार्श्वभूमी
भारत-रशिया संबंधांचा ऐतिहासिक संदर्भ देताना जयशंकर यांनी १९५०च्या दशकापासून दोन्ही देशांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. भारताच्या सुरक्षेला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण झाला असताना सोव्हिएत महासंघाने भारताला विविध प्रकारे पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. आज भारत-रशिया संबंध केवळ संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, नैसर्गिक संसाधने, अणुऊर्जा आणि अवकाश क्षेत्रातही सहकार्य वाढले असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT