पुणे

वाई:-‘विकसित भारत’हा भारतीय जनमाणसाचा आंतरिक हुंकार:- मदन भोसले

CD

तरुणाईच्या जोरावर भारत २०४७ मध्ये महासत्ता बनेल

डॉ. दीपक करंजीकर; किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

वाई, ता. १ : विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास आपला देश नक्कीच विकसित राष्ट्र बनू शकतो. केवळ भौतिक प्रगती म्हणजे विकास नसून, तरुणांच्या मनामध्ये विकसित भारताचे स्वप्न पेरणे गरजेचे आहे. अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याने त्याचा विकासात निश्चितच फायदा होईल. याच जोरावर भारत २०४७ मध्ये दुसरी आर्थिक महासत्ता बनेल. आजच्या घडीला आपला देश जगाच्या तंत्रज्ञानाचे इंजिन आहे. आज प्रत्येकाने मी काय करू शकतो? हा प्रश्न जरी स्वतःला विचारला आणि कामाला सुरुवात केली, तरी परिणाम दिसायला सुरुवात होईल, असे प्रतिपादन विकसित भारत कार्यालय सल्लागार डॉ. दीपक करंजीकर यांनी केले.

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, बीसीए विभाग, अंतर्गत दर्जा हमी कक्ष आणि सामाजिक शास्त्रे यांच्या वतीने ‘एक्सप्लोरिंग पिलर्स फॉर विकसित भारत-२०४७’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, विकसित महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय सल्लागार डॉ. परशुराम पाटील, भय्यासाहेब जाधवराव, श्री. इंगवले, डॉ. विनोद वीर उपस्थित होते.

यावेळी श्री. भोसले, डॉ. फगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपाली चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आनंद घोरपडे यांनी परिचय करून दिला. रेश्माबानो मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश गावित यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती डॉ. पाटील यांनी विकसित भारतातील शेती क्षेत्राचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सारंग भोला अध्यक्षस्थानी होते. प्रा. जयवंत पवार यांनी परिचय करून दिला. प्रा. अर्चना कदम यांनी आभार मानले. तिसऱ्या शोधनिबंध सादरीकरणाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य, डॉ. नंदकुमार कदम यांनी काम पाहिले. समारोप समारंभासाठी प्राचार्य डॉ. अशोक गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी अहवालाचे वाचन केले. चर्चासत्रात एक्सप्लोरिंग पिलर्स फॉर विकसित भारत या अनुषंगाने सखोल चर्चा झाली. प्रा. वैशाली राजपुरे आणि प्रा. किशोर गुजर यांनी चर्चासत्राच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले. देशभरातील नामवंत संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या राष्ट्रीय चर्चासत्रास उपस्थित होते.
-----
07626
वाई : चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना मदन भोसले. त्या वेळी उपस्थित मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Ferry Boat: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू, प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

SCROLL FOR NEXT