पुणे

विदेश संक्षिप्त

CD

विदेश संक्षिप्त

*उत्तर अमेरिका
‘२०१४ वर्ष निर्णायक’
वॉशिंग्टन : भारताच्या आर्थिक विकासाला वेग आणण्यासाठी २०१४ हे वर्ष निर्णायक ठरले आणि त्याच काळात अमेरिकेबरोबरील संबंध विस्तारले, असा दावा भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना केला. भारत-अमेरिका व्यापार पुढील चार वर्षांत ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहभाग थांबविला
न्यूयॉर्क : अमेरिका खंडाच्या संरक्षणासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीला जाणे थांबविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. कॅनडा आणि युरोपीय देश स्वत:च्या संरक्षणाचा भार अमेरिकेवर टाकत असल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ही बैठक दुसऱ्या महायुद्धकाळापासून आयोजित करण्याची प्रथा आहे.

भागीदारीला पाठिंबा
वॉशिंग्टन : आयातशुल्काच्या बाबतीत भारत-अमेरिकेत मतभेद असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांच्या मजबुतीकरणासाठी अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी पाठबळ दिले. जागतिक समस्या सोडवणुकीसाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेही मत अमेरिकेच्या काही लोकप्रतिनिधींनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.

*आफ्रिका
इबोलाचा संसर्ग
किन्शासा : कांगो देशात इबोला विषाणूचा संसर्ग आणखी पसरला असून पाचशेहून अधिक जणांना लागण झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच, अद्यापपर्यंत १३१ जणांचा मृत्यूही झाला आहे.

मशिदीवर हल्ला
सॅनदिएगो : अमेरिकेतील सॅनदिएगो येथील एका मशिदीवर दोन किशोरवयीन मुलांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर युवकांनी काही अंतरावर पुढे जात स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली.

ऑस्ट्रेलेशिया
नोकर कपात
वेलिंग्टन : प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने सरकारी नोकरदारांची संख्या १४ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून यामुळे नऊ हजारांहून अधिक जणांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

*आशिया
‘लवकरच परतेन’
नवी दिल्ली : दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांचा प्रभाव वाढत असल्याने बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा ‘काळे दिवस’ येण्याची शक्यता असल्याचा इशारा माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला आहे. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी बांगलादेशमध्ये योग्य वेळी निश्‍चितपणे परतेन, असा विश्‍वासही व्यक्त केला. त्या सध्या भारतात विजनवासात आहेत.

शर्मा मुख्य न्यायाधीश
काठमांडू : नेपाळमध्ये मनोजकुमार शर्मा यांची देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींची दखल घेत आणि त्यावर चर्चा केल्यानंतर निवड समितीने शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. त्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT