पुणे

भारतीय मसाल्यांवर शुल्क आकारू नका

CD

वॉशिंग्टन, ता.७ (पीटीआय) ः ‘बहुचर्चित भारत- अमेरिका व्यापार कराराबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसतानाच भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या मसाल्यांवरील शुल्क माफ केले जावे,’ अशी अपेक्षा अमेरिकेतील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प सरकारकडे त्यांनी तशी मागणी केल्याचेही समजते. अमेरिकी ग्राहकांना यामुळे भारतीय मसाले स्वस्त किमतीत उपलब्ध होऊ शकतील, असे त्यांना वाटते. अमेरिका दरवर्षी ७० कोटी डॉलरचे मसाले भारताकडून आयात करते. भारत- अमेरिकेमध्ये व्यापार कराराच्या अनुषंगाने मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून चर्चा सुरू असली तरीसुद्धा त्यावर अद्याप अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. यंदा फेब्रुवारीमध्येच दोन्ही देशांनी या द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर ही चर्चा पुढे सरकलेली नाही.‘अमेरिकी स्पाइस ट्रेड असोसिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डोनाल्ड प्रॅट म्हणाले, की लोकांचा हळदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी तिचा केवळ मसल्यापुरता विचार केला जात होता. आता हळदीचा चहा देखील प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पोषणमूल्ये लोकांना समजली आहेत.

प्रतिक्रिया
भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मसाल्यांवरील शुल्कामध्ये नक्कीच सवलत देण्यात येईल, अशी आशा आम्हाला आहे. यामुळे दोन्ही देशांतील मसाल्यांचा व्यापार विनाव्यत्यय सुरू राहू शकेल.
- डोनाल्ड प्रॅट, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकी स्पाइस ट्रेड असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

Latest Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित

Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

SCROLL FOR NEXT