भारत-अमेरिका व्यापार
५०० अब्ज डॉलरवर नेणार
मुंबईतील कार्यक्रमात सर्जिओ गोर यांचा निर्धार
मुंबई, ता. २१ (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विक्रमी २४० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. पुढील तीन वर्षांमध्ये तो विक्रमी ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य अमेरिकेने निश्चित केले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी केले.
मुंबईमध्ये झालेल्या ‘फ्रीडम २५०’ या विशेष कार्यक्रमात उद्योगपती आणि राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेमध्येही हीच कटिबद्धता पुन्हा व्यक्त करण्यात आली. व्यापारातील यापुढील विस्तार सेमीकंडक्टर, दुर्मीळ खनिजे, ऊर्जा, संरक्षण आणि सुपरइंटेलिजन्स यांसारख्या संवेदनशील भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी सातत्याने उंचावत आहे. भारत-अमेरिका भागीदारीचा विस्तार खोल समुद्रातील पायाभूत सुविधांपासून अवकाशापर्यंत होत आहे. या भागीदारीची सुरुवात समुद्राच्या खोल भागातील महत्त्वपूर्ण डेटा पायाभूत सुविधांपासून होते. त्यानंतर कारखाने, प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांपर्यंत तिचा विस्तार होतो. व्यावसायिक अवकाश संशोधनाच्या माध्यमातून ती अवकाशापर्यंत पोहोचते, असे ते म्हणाले.
मुंबई आर्थिक केंद्र
भारत-अमेरिका भागीदारीत आर्थिक केंद्र म्हणून मुंबईच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले. अमेरिकेतील महत्त्वाच्या ५०० कंपन्या मुंबईमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये गुगल, मेटा, आयबीएम या तंत्रज्ञान कंपन्या, प्रोक्टर अँड गॅम्बल, जॉन्सन अँड जॉन्सन यांसारख्या ग्राहकोपयोगी, फायझर, अबॉट आणि मर्क यांसारख्या औषध क्षेत्रातील आणि सिटी बँक, बँक ऑफ अमेरिका, जेपी मॉर्गन चेस यांसारख्या वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.