Army Sakal
पुणे

भारतीय लष्कराने पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव पथके तैनात केली

राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी व त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी, यामुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी (Rain) व त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी, यामुळे अनेक ठिकाणी पुर (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पुराचा तडाखा बसला आहे. नागरी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय लष्कराने (Indian Army) पूरग्रस्त भागांमध्ये स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत. (Indian Army Deployed Relief and Rescue Teams in the Flood Hit Areas)

‘ऑपरेशन वर्षा २१’च्या अंतर्गत औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर समूहाची एकूण १५ मदत आणि बचाव पथके  रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आली होती. ही पथके परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरी प्रशासनाला मदत करणार आहेत.

भारतीय लष्कर या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी आहे आणि सैन्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. पूरग्रस्त भागातून हलविण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी मदत पथकांमध्ये अभियंते आणि लष्करातील वैद्यकीय पथकाचा समावेश करण्यात आला आहे. असे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT