पुणे

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भारतीय संविधानाचे सार विषयावर व्याख्या

CD

विद्यार्थ्यांनो, संविधान वाचा;
जबाबदार नागरिक बना
ॲड. गायकवाड; शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ३ : भारतीय संविधान हे केवळ देशाचा कारभार चालविणारे कायदेशीर दस्तऐवज नसून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय लोकशाहीचा पाया आहे, असे प्रतिपादन ॲड. व्ही. एस. गायकवाड यांनी केले. संविधानातील मूल्ये आचरणात आणल्यास विद्यार्थी अधिक जागरूक, जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘भारतीय संविधानाचे सार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ॲड. संपतराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ॲड. गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करून त्यांना सुजाण, जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक घडविणे हेच भारतीय संविधानाचे सार आहे. त्यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्क, तसेच बदलत्या सामाजिक गरजा व परिस्थितींनुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया याबाबत माहिती दिली. भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरलेल्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक खटल्याचाही त्यांनी उल्लेख केला. संविधानातील विविध कलमांचा संदर्भ देत त्यांचा अर्थ व नागरिकांच्या जीवनातील महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रणजित देशमुख यांनी केले. प्रा. विद्याधर पैलवान यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

Latest Marathi News Live Update : विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती गंभीर; डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ धाव घेत दिली वैद्यकीय मदत

SCROLL FOR NEXT