काही शक्ती समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून लोकशाहीत नाकारले गेलेले काही घटक वेगवेगळ्या स्वरूपात समोर येऊन व्यवस्थेला लक्ष्य करतात. ‘सीजेपी’ त्यांच्याच वतीने काम करते.
- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री
प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या आवाजाला ‘दहशतवाद्यांचा आवाज’ म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे.
- मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेस
आरएसएस नकली हिंदू आहेत. भाजपवाले नोंदणीकृत नकली हिंदू आहेत ते. खरे हिंदू नेहमी वेद, पुराण, शास्त्रामध्ये जे सांगितले आहे, त्याप्रमाणे वागतात. आणि नकली हिंदू ना वेद, पुराण मानात, ना गुरुला मानतात.
- शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना संबंधित कायदा मंजूर करणे हे भाजपचे तात्काळ उद्दिष्ट आहे; तर घटनात्मक तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेत पुरेसे संख्याबळ मिळवणे हे त्यांचे व्यापक ध्येय आहे.
- जयराम रमेश, काँग्रेस नेते
परराष्ट्र मंत्रालय म्हणते की पासपोर्ट हे प्रवासासाठीचे दस्तऐवज आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. खरंच? मग ही व्यक्ती भारतीय नागरिक असल्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ते काही लोकांना हे प्रवासाचे दस्तऐवज देत आहेत का? हे हास्यास्पद आहे.
- जावेद अख्तर, गीतकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.