Boycott_China 
पुणे

#BoycottChina : पुण्यातील 'या' नामांकित संस्थेनेही टाकला चीनी वस्तूंवर बहिष्कार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी विविध संघटनांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात आता दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट (आयआयए)नेही सहभाग घेतला आहे.

आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व ठिकाणी चिनी वस्तू आणि त्यांच्या सेवा वापरू नये, असे आवाहन आयआयएने आपल्या सभासदांना केले आहे. याबाबतचे एक पत्र संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे.

व्यापार संबंधातून आपण आतापर्यंत चीनने बनवलेल्या अनेक वस्तू आणि सुविधा सेवा वापरत आलो आहोत. हा सर्व व्यवहार दरवर्षी सुमारे 50 मिलियन डॉलरच्या घरात आहे.  त्यातून चीनला मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला आहे. मात्र त्या बदल्यात त्यांनी आपल्याच हद्दीत घुसखोरी सुरू केली. चीनला लागून असलेल्या अपल्या अनेक ठिकाणच्या भूभागावर त्यांनी हक्क दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. यातून गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यामुळे देशाप्रती आपले कर्तव्य आणि या शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून आपण चीनी वस्तू आणि सेवा वापरणे बंद करावे, असे आवाहन या पत्रकाच्या माध्यमातून आयआयएने आपल्या सदस्यांना केले. 

चिनी वस्तू बायकॉट केल्यास त्याचा चीनला मोठा फटका बसणार आहे. त्यांच्या वस्तूवर बहिष्कार घालणे सुरू ठेवले तर आपण व्होकल टू लोकल होणार आहोत. तसेच या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेस चालना मिळणार आहे. त्यामुळे आपले सर्व सभासद, आपल्याशी संबंधित असलेल्या सर्व संघटना आणि संबंधित सर्व उद्योग- व्यवसायिक यापुढील काळात चिनी वस्तू आणि त्यांच्या सेवेवर पूर्णपणे बहिष्कार घालतील, असा विश्वास आयआयएचे अध्यक्ष दिव्य कुश यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत कुश यांनी सांगितले की, युद्ध केवळ शास्त्राच्या माध्यमातून केले जात नाहीत. कधीतरी आर्थिक कोंडी किंवा राजकीय पातळीवर खेळी करून लढाई जिंकता येते. याच पार्श्वभूमीवर आम्ही हा निर्णय घेतला. आपण ज्यांना सेवा पुरवत आहोत त्यांना चिनी वस्तू खरेदी न करण्याचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आर्किटेक्टला करत आहोत.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात एक लाख आर्किटेक्ट आहे. त्या सर्वांना हे आवाहन करण्यात आले आहे. तर इंटिरियर डिझाइनचा व्यवसाय असणाऱ्यांना देखील आम्ही हे पत्र पाठवले आहे. ट्रेडर्स आणि इंडस्ट्री देखील याबाबत सकारात्मक आहे.
- दिव्य कुश, अध्यक्ष, आयआयए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT