पुणे

शाश्वत शेतीसाठी युगांडाशी सामंजस्य

CD

मंचर, ता. ११ : आफ्रिका खंडातील वाढती लोकसंख्या, मातीच्या आरोग्याचा होत असलेला ऱ्हास आणि भविष्यातील अन्नसुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन भारतीय सेंद्रिय शेती तंत्रज्ञान आफ्रिकेपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने मंचर (ता. आंबेगाव) येथील सेंद्रिय शेती तज्ज्ञ राहुल पडवळ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. युगांडातील कंपाला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि पुण्यातील श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्यात सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शाश्वत शेतीसाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला.
पडवळ यांनी आपल्या सुमारे दहा दिवसांच्या आफ्रिका दौऱ्यात केआययूच्या कंपाला येथील मुख्य कॅम्पस तसेच पश्चिम युगांड्यातील ईशाका कॅम्पस येथे सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान, जागतिक अन्नसुरक्षा, शाश्वत शेती आणि मृदा आरोग्य या विषयांवर व्याख्याने दिली. विद्यापीठाचे व्यवस्थापन, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘‘आफ्रिकेतील नैसर्गिक जैवभाराची उपलब्धता आणि भारतातील तंत्रज्ञान यांचा योग्य संगम साधल्यास सेंद्रिय खतांच्या माध्यमातून मातीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढविणे शक्य आहे,’’ असे पडवळ यांनी सांगितले.

यावेळी कम्पाला इंटरनेशनल युनिव्हिसिटीचे कुलगुरू प्रा. मोहम्मद एंगोमा, उपकुलगुरू प्रा. रेजींना एजेंमोट एंवादीरो, डॉ. मुंडू मुस्तफा, डॉ. जेकब अशबिरी, संचालक प्रा. डॉमिनिक बायरुगाबा, विद्यापीठाचे संचालक मंडळ, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.

सेंद्रिय कचरा ही समस्या नसून भविष्यातील संपत्ती आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे उच्च दर्जाच्या सेंद्रिय खतांमध्ये रूपांतर केल्यास मृदा आरोग्य, अन्नसुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविता येतील. भारत-युगांडा सहकार्याच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आफ्रिकेतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
- राहुल पडवळ, तज्ज्ञ, श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज, पुणे
16338

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT