पुणे, ता. २७ : पूर्वी खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जात होते. मात्र, गेल्या बारा वर्षांत क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून, खेळ हा राष्ट्रउभारणीचा आणि युवाकेंद्रित विकासाचा केंद्रबिंदू बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रीडा धोरणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सुधारली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘माय भारत’ आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी आभासी संवाद साधला. यानिमित्त अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मोहोळ बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, उपाध्यक्ष ईश पाटील, क्रीडा संचालक व ऑलिंपियन डॉ. हिना सिद्धू, आंतरराष्ट्रीय तिरंदाज शर्वरी शेंडे आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त टेनिसपटू ऋतुजा भोसले उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘क्रीडा क्षेत्रासाठीच्या निधीत मोठी वाढ करण्यात आली असून, गावच्या मैदानावर खेळणाऱ्या मुलाला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचता यावे, अशी क्रीडा परिसंस्था तयार केली जात आहे.’’
राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी ३,६४४.४१ कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो - 45299
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.