Nirvangi Village Sakal
पुणे

Walchandnagar News : देशी गाईच्या ओटीभरणाचा कार्य्रकम; पेडकर कुंटूबाचा पुढाकार

निरवांगी (ता. इंदापूर) येथील निवृत्ती रामचंद्र पेडकर या शेतकऱ्याने गौरी (देशी गाईचे) च्या ओटीभरणाचा कार्यक्रम करुन शेतकऱ्यांनी देशी गाईचे संवर्धन करण्याचा अनोखा संदेश दिला.

राजकुमार थोरात

वालचंदनगर - निरवांगी (ता. इंदापूर) येथील निवृत्ती रामचंद्र पेडकर या शेतकऱ्याने गौरी (देशी गाईचे) च्या ओटीभरणाचा कार्यक्रम करुन शेतकऱ्यांनी देशी गाईचे संवर्धन करण्याचा अनोखा संदेश दिला.

शेतकऱ्यांची जनावरे ही त्यांची खरी संपत्ती असते. शेतकरी गाई -बैलांना पोटच्या पोरासारखे संभाळून जीव लावत असतो. जर एखाद्या दिवशी शेतकऱ्यांची गाई आजरी पडली असेल आणि तिने चारा खालला नसेल तर कुंटूबातील सदस्यांना एक घास देखील गाेड लागत नाही.

इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावामध्ये निवृत्ती रामचंद्र पेडकर, भास्कर रामचंद्र पेडकर, किरण अशोक पेडकर,मंगेश भास्कर पेडकर यांचे एकत्र कुंटूब आहे. त्यांना १९ एकर शेती असून शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेत असतात. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय ही करीत आहेत.

त्यांच्याकडे सहा गाई व दोन वासरे आहेत. पेडकर कुंटूब गाईवरती जीवापाड प्रेम करीत असते. दररोज ७५ लिटर दुध डेअरीला घालतात. त्यांना त्यांच्या पाहुण्यांनी तीन महिन्याचे देशी गाईचे वासरु दिले होते. पेडकर कुंटूबाने वासराचे नाव गौरी ठेवले आहे. त्याचा पोटच्या पोराप्रमाणे संभाळ केला. आख्या कुंटूबाला गौरीचा लळा लागला आहे.

सध्या गौरी सात महिन्याची गाभण असून दोन महिन्यामध्ये तिला वासरु होणार आहे. गौरीला वासरु होणार असल्याचा पेडकर कुंटूबाला खूप आनंद झाला आहे. पेडकर कुंटूबाच्या घरी घरातील एका लहान मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये त्यांनी गौरीच्या ओटीभरणाचा ही कार्यक्रम घेतला.

ओटीभरणाच्या कार्यक्रमानिमित्त गौरीला सजविण्यात आले होते. गावातील महिलांनी गौरीचे ओक्षवंत करुन तिची ओटी भरली. या उपक्रमाबद्दल पेडकर कुंटूबाचे कौतुक होत आहे.

देशी गाईचा वंश वाचविण्यासाठी पुढाकार...

गावातील काही युवकांनी एकत्र येवून देशी गाईचा वंश वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गोरक्ष दलाची स्थापना केली असून शेतकऱ्याच्या घरासमोर किमान एक तरी देशी गाई असावी, यासाठी जनजागृती करीत आहेत. यासाठी अंकुश गणपत पवार, नवनाथ सपकळ, ज्ञानेश्‍वर पेडकर, गणेश रेडकर, सुरज पोळ, डॉ. राजेंद्र पोळ प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT