Indigenous Technologies for Indians Biometric Data Security  C-DAC for bioinformatics research
Indigenous Technologies for Indians Biometric Data Security C-DAC for bioinformatics research sakal
पुणे

Pune News : भारतीयांच्या ‘जैविक डेटा’ सुरक्षेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान

सम्राट कदम

पुणे : प्राणी, वनस्पती, सुक्ष्मजीव आणि माणसांचा जैविक डेटा हा राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. आजवर भारतीयांच्या जणूकीय डेटापासून ते सुक्ष्मजीवांच्या वैद्यकीय डेटापर्यंतची माहिती ही एका खुल्या बॅंकेप्रमाणे वापरली जात असून, त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रगत संगणन अध्ययन केंद्राने (सी-डॅक) स्वदेशी सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे.

सी-डॅकच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनी ‘इंटीग्रेटेड कंप्युटींग क्लाऊड’ (आयसीई) आणि ‘मॉलीक्यूलर डायनॅमिक व्हिज्वलायझेशन ॲन्ड ॲनॅलिसिस टूल’चे (डीपीसीआयटी) अनावरण करण्यात येणार आहे. सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महासंचालक ई. मंगेश, वरीष्ठ संचालक डॉ. राजेंद्र जोशी यांनी यासंबंधीची माहिती दिली.

या निमित्त तीन दिवसीय ‘ॲक्सलरेटींग बायोलॉजी’ या परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. देशातील वैद्यकीय डेटाचे संकलन, विश्लेषण आणि संशोधनासाठी एक स्वदेशी प्लॅटफॉर्म सी-डॅकच्या बायोइन्फॉर्मेटीक ग्रुपने विकसित केला आहे.

अ) इंटिग्रेटेड कंप्युटींग क्लाउड (आयसीई)

जणूकीय डेटासाठी क्लाउड कंप्युटीगवर आधारीत प्रणाली म्हणजे आयसीई होय. भारतातील जणूकीय डेटाचे संकलन, विश्लेषण आणि वापरासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. सी-डॅकच्या माध्यमातून कॉम्प्युटींग सुविधा, स्टोरेज आणि विश्लेषण सुविधा उपलब्ध केली जाणार.

- गरज काय?

१. भारतातील जैविक डेटा अत्यंत क्लिष्ट पद्धतीचा

२. सध्या असुरक्षित पद्धतीने डेटा साठविला आणि वापरला जातो

३. भारत केंद्रीत संशोधन आणि उत्पादनांसाठी क्लाउड कंप्युटींगची गरज

४. जागतिक स्तरावर भारताची सामरीक भूमिका वाढत चालली आहे

वैशिष्ट्ये

- वापरकर्त्याला स्वदेशी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरद्वारे सुरक्षीत डेटा साठविता येणार

- आवश्यकतेनुसार कंप्युटींग सुविधा उपलब्ध होणार

- नेक्स्ट जनरेशन सिक्वेंसिंगसाठी माहितीचे विश्लेषण शक्य

फायदे

आरोग्यसेवा, कृषी, पशुधन आणि पर्यावरण क्षेत्रातील स्वदेशी संशोधनासाठी जैविकडेटाचा एक सुरक्षीत व सक्षम पर्याय उपलब्ध

ब) डीपीसीआयटी ः प्रयोग आणि सिम्युलेशनद्वारे तयार होणाऱ्या जैवरेणूच्या (बायोमॉल्यूक्युल) रचनात्मक डेटाचे विश्लेषण आणि अवलोकणासाठी मॉल्यूक्यूलर डायनॅमिक व्हिज्युअलायझेशन ॲन्ड ॲनॅलिसिस टूलची (डीसीपीआयटी) निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे औषधांच्या पुर्नवापरासह विविध जैवरासायनिक सिम्युलेशन करता येतील.

वैशिष्ट्ये

- मोठ्या प्रणाणावर जैवरेणूंचे वर्तन आणि अभिक्रिया त्रिमीतीय सिम्युलेशनच्या माध्यमातून अभ्यासता येते

- विविध जैवरेणूंचे एकमेकांसोबतचे त्रिमितीय वर्तन पडताळता येते

- लिनक्स ऑपरेटींग सिस्टमवर आधारीत सॉफ्टवेअर

फायदे

- साथीच्या काळात औषधांच्या पुनर्वापराचे संशोधन जलद गतीने होतात

- आयुर्वेदीक जैवरसायनांचे सिम्युलेशन स्तरावर उपयुक्तता तपासता येतात

- औषधांच्या प्रत्यक्ष वापराआधी सिम्युलेशनद्वारे परिणाम अभ्यासता येतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT