पुणे

इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कारांची घोषणा

CD

पुणे, ता. २९ ः दिवंगत गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री व बालसाहित्यकार इंदिराबाई अत्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत.

डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. व कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी ही माहिती दिली. गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’, प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’, आश्लेषा महाजन यांच्या ‘गप्पी गप्पा आणि इतर कथा’ या पुस्तकांना आणि ऋषिकेश दाभोळकर, हर्षल कोऱ्हाळे यांच्या ‘कुल्फी’ दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर झाले आहेत.
अभिषेक जाखडे लिखित ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ, आतील चित्रांसाठी चित्रकार सई देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला. श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ आणि संजय ऐलवाड यांच्या ‘झिब्राची गोष्ट’ या पुस्तकांना विशेष उल्लेखनीय पुस्तकांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा १४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवनमधील मुख्य सभागृहात होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

SCROLL FOR NEXT