Indira Shankar Nagari sakal
पुणे

Society Redevelopment : सोसायट्यांच्या पुनर्विकासात बनवाबनवी; कोथरूडमधील प्रकार आला उघडकीस

कोथरूड येथील इंदिरा शंकर नगरी परिसरातील १४ एकरातील ३६ हून अधिक सोसायट्या आणि ६० रो-हाऊसमधील अध्यक्ष व मालकांना हा आला अनुभव.

उमेश शेळके -@sumesh_sakal

पुणे - गेली २० वर्षे तुम्ही एका सोसायटीत राहत आहात... सोसायटीचे मानीव अभिहस्तांतरण होऊन जमिनीची मालकी देखील मिळाली आहे.... एक दिवस अचानक सोसायटीला सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांचे पत्र येते... त्यांची भेट घेतल्यानंतर तुमच्यासह आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांची फेडरेशन स्थापन झाली आहे... त्यामाध्यमातून सर्व सोसायट्यांचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे समजले तर तुम्हाला काय वाटेल?, होय... असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोथरूड येथील इंदिरा शंकर नगरी परिसरातील १४ एकरातील ३६ हून अधिक सोसायट्या आणि ६० रो-हाऊसमधील अध्यक्ष व मालकांना हा अनुभव आला आहे. इंदिरा शंकर नगरी हा १४ एकराचा परिसर आहे. या जागेचे मूळ मालक वालावलकर कुटुंबीयातील आहेत. आहे. त्यांनी हा परिसर विकसित करण्यासाठी आर. एम. कन्स्ट्रक्शन यांना दिला होता.

कंपनीकडून या परिसरात २००२ पर्यंत ३६ हून अधिक सोसायट्या आणि ६० हून अधिक रो-हाऊसची उभारणी करून त्यांची विक्री केली. काही सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतर झाले असून सातबारा उताऱ्यावर सोसायट्यांची नावे लागली आहेत. तर काही सोसायट्यांची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना कोणतीही पूर्व कल्पना न देता फेडरेशन स्थापले आहे. त्या फेडरेशनचे सभासद म्हणून या सोसायट्यातील अध्यक्षांची नावे सभासद म्हणून दर्शविली आहेत. त्यासाठी या अध्यक्षांच्या नावाने शुल्कही भरले आहे.

फेडरेशनच्या नावाने संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतर करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपनिबंधकांकडून सोसायट्यांना नोटिसा आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. यावरून पुनर्विकासाच्या नावाखाली शहरात कशा प्रकारे फसवणूक सुरू आहे, हे समोर आले आहे.

काय प्रकार घडला?

  • सोसायट्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता आणि त्यांची मान्यता न घेता चक्क इंदिरा शंकर नगरी सहाकारी गृहरचना संस्थांचा संघ (फेडरेशन) स्थापन करण्यात आला.

  • या फेडरेशनच्या नावाने वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन संपूर्ण परिसराच्या पुनर्विकसासाठी बांधकाम व्यावसायिकांनी निविदा मागविल्या.

  • उपनिबंधकांकडून सोसायट्यांना नोटिसा आल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

  • गेली काही महिन्यांपासून सोसायट्या या सगळ्या प्रकाराविरोधात लढत आहेत.

  • पोलिस व सहकार खात्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची तक्रार या सोसायट्यांच्या अध्यक्षांनी ‘सकाळ’ कार्यालयात भेटून केली आहे.

कोणतीही परवानगी दिली नाही

यासंदर्भात इंदिरा शंकर नगरी परिसरातील आर. एम. हाईट्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष विजयकांत गायकवाड, संजय पटवर्धन आणि शांताराम बांगर म्हणाले, ‘‘जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती घेतल्यानंतर या फेडरेशनमध्ये आमच्या सोसायटीचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. आमच्या सोसायटीकडून फेडरेशनचे सभासद होण्यासाठी कोणीही आणि कोणतीही परवानगी दिली नाही अथवा फेडरेशनचे सभासद झाले नाहीत. परंतु आमच्या नावावर परस्पर रोख रक्कम भरून सोसायटी फेडरेशनची सभासद झाली आहे, असे आम्हाला आढळून आले. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन परिसरातील सर्व सोसायट्यांच्या सभासदांनी ही गोष्ट कागदपत्रांसह त्यांच्या निदर्शनास आणून दिली व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांकडे तक्रारही केली आहे.’’

मृत व्यक्तीने दिली परवानगी

जयश्री मिरकुटे म्हणाल्या, माझे वडील मधुकर लक्ष्मण सातपुते यांचे २०१३ मध्ये निधन झाले आहे. बल्लाळ सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत, असे दाखवून फेडरेशनचे मानीव अभिहस्तांतर करण्यास त्यांनी परवानगी दिली आहे, असे दर्शविले आहे. तसेच बल्लाळ सोसायटीने २०२३ मध्ये फेडरेशनकडे पैसे भरले असल्याचे फेडरेशनचे कागदपत्र तपासल्यानंतर दिसून आले. हे सर्व परस्पर करण्यात आले आहे.’

कुठे प्रकार घडला?

  • ३६ - सोसायट्या

  • ६० - रो-हाऊस

  • १४ एकर - कोथरूड परिसर

बांधकाम व्यावसायिकांकडून इंदिरा शंकर नगरीच्या पुनर्विकासासाठी फेडरेशनने ज्या निविदा मागविल्या आहेत, त्यासाठीच्या जाहिरातीमध्ये फेडरेशनच्या नावाने २५ हजार रुपयांची अनामत रक्कम परत न करण्याच्या बोलीवर जमा करण्याचा उल्लेख आहे. यावरून फसवणूकीचा हा प्रकार दिसत आहे.

- बंडोपंत स्वयंम, गार्डन व्ह्यू सोसायटी

इंदिरा शंकर नगरीच्या फेडरेशनची नोंदणी तीन ते चार वर्षांपूर्वी झाली आहे. तो विषय माझ्याकडे नाही. फेडरेशनने आता जागेचे मानीव अभिहस्तांतर करण्यासाठी माझ्याकडे अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, यांची काळजी घेतली जाईल.

- संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली शहरात फसवणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे प्रकार रोखण्याची गरज आहे. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT