पुणे

ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांना कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर

CD

फोटो ः इंद्रजित भालेराव
PRB26B60081
--------------------
कवी इंद्रजित भालेराव
यांना कुसुमाग्रज पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ७ : प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान जाहीर झाला आहे. काव्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुण्यातील विदिशा विचार मंचातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवारी (ता. १०) रोजी सायंकाळी साडेपाचला पुण्यात होणार आहे, अशी माहिती संस्थेने दिली.

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी मंगळवारी (ता. दहा) हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते भालेराव यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. विदिशा विचार मंचाचे संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी ही माहिती दिली. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी पहिल्या वर्षी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, दुसऱ्या वर्षी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, तिसऱ्या वर्षी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. भालेराव यांचे १५ काव्यसंग्रह, ललितलेख संग्रह, सहा संपादने आणि इतर साहित्य प्रकाशित झालेले आहे. शासनासह विविध संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले आहे. महाराष्ट, कर्नाटक, गोवा या राज्याच्या अभ्यासक्रमासह राष्ट्रीय अभ्यासक्रमातही भालेराव यांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
------------

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

T20 WC , IND vs NZ: न्यूझीलंडच्या कर्णधारानेही भारतीयांनाच दिली वॉर्निंग; २०२३ वर्ल्ड कपमध्ये फायनलला जे झालं, तसंच उद्या पण...

Iran-America War: ''ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते..'', अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज बुडाल्यानंतर भारताची प्रतिक्रिया

डोळ्यात आणि तोंडात तिखट टाकलं, अमानुष मारहाण अन्..., दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; संतापजनक कारण समोर

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

SCROLL FOR NEXT