पुणे

‘भोरमधील इंद्रायणीच्या वाणास बाजारपेठ उपलब्ध करून देणार’

CD

उत्रौली, ता. १२ : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भोर तालुक्यातील सुप्रसिद्ध सुवासिक इंद्रायणी भात वाणाचे ब्रँडिंग करून तांदळाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. सोयाबीनपासून कच्चे तेल तयार करणे, बांबू प्रकल्पाची उभारणी करणार आहे,’’ अशी माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (ता. १०) लोकनेते अनंतराव थोपटे मुख्य बाजार आवारात दिली.


भोर येथे २७ व्यापारी गाळ्यांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी थोपटे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, धरणातील आवर्तने सोडताना भोरला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्या दुष्काळामुळे भाताचे उत्पन्न अडचणीत असताना बाजार समितीच्या माध्यमातून इंद्रायणी भाताची खरेदी करून त्याचा तांदूळ तयार करून १, २ आणि ५ किलोचे पॅकिंग केले जाईल. यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ खरेदी करता येईल.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, पंचायत समिती सदस्या सुषमा चव्हाण, सभापती सुरेश राजिवडे, उपसभापती प्रवीण शिंदे, बाळासाहेब गरुड, रोहन बाठे, आनंदराव आंबवले, ॲड. जयश्री शिंदे, अमर बुदगुडे, अनिल सावले, विक्रम चव्हाण, रवींद्र कंक, संतोष धावले आदी उपस्थित होते. राजेंद्र शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर महेश धाडवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग! आज महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT