पुणे

आळंदी, चऱ्होलीमध्ये राबले ४०० स्वच्छता दूत

CD

आळंदी, ता. २२ : ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात रविवारी (ता. २२) भोसरी शाखेच्या माध्यमातून चऱ्होली आणि आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आळंदी आणि चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, सागर कुऱ्हाडे तसेच मिशनचे सेवादार उपस्थित होते. यावेळी आळंदीतील इंद्रायणी नदीपात्र तसेच स्मशानभूमी, इंद्रायणीच्या पुलाखाली असलेला सर्व जलपर्णीयुक्त कचरा, कपडे, प्लास्टिकच्या वस्तू नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्या.
याचबरोबर चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतही इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता मोहीम या स्वच्छता दूतांच्या मार्फत करण्यात आली. पुरुष आणि महिला एकत्रितपणे नदीपात्रात उतरून सफाई केली. सुमारे ४०० स्वच्छता दूत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी एकत्रित आले होते. जमा झालेला सर्व नदीपात्रातील कचरा ट्रॅक्टर साह्याने एकत्रितपणे घनकचरा व्यवस्थापन केले. स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्याच ठिकाणी सत्संगही झाला.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, पण दुर्दैवाने ही जबाबदारी माझ्यावर आली - देवेंद्र फडणवीस

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

Shegaon Temple: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावातील श्रींचे मंदिर भक्तांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी!

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

SCROLL FOR NEXT