पुणे

रसायनयुक्त सांडपाण्याने इंद्रायणी काळवंडली

CD

आळंदी, ता. १५: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित आणि रसायनयुक्त सांडपाण्याचा प्रवाह सुरूच आहे. त्यामुळे आळंदीतील सिद्धबेट ते पुंडलिक मंदिर परिसरात इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे काळवंडला आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने नदीपात्रात शेकडो मृत माशांचा खच तरंगू लागला आहे. मृत मासे तसेच सांडपाण्यामुळे नदीपात्राजवळ दुर्गंधी पसरली आहे.

सिद्धबेट परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले गेल्याने इंद्रायणी नदीपात्रात माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चिखली, कुदळवाडी, तळवडे भागातील छोटे-मोठे लघुउद्योग आणि घरगुती स्वरूपाचे सांडपाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदी पूर्णपणे काळवंडली आहे. नदीच्या पाण्याचा रंग पाहून गटाराचे स्वरूप आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.

दरम्यान, इंद्रायणी प्रदूषण सन २००५ पासून होत आहे. मात्र स्थानिक आणि तालुका पातळीवर कमजोर नेतृत्व असल्याने आळंदीला राज्य सरकारकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही, याबाबत आळंदीकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकारी आणि प्रशासन मात्र याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. आळंदी नगरपरिषद पदाधिकारी आणि प्रशासन अधिकारी नदीपात्राचे प्रदूषण होऊ नये म्हणून गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालतात, दुसरीकडे मात्र सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जात असल्याचे चित्र आहे. इंद्रायणीबाबत पूर्ण बेफिकिरी पिंपरी महापालिका आणि आळंदी नगरपालिका प्रशासनाकडून दिसून येते.
- डॉ. सुनील वाघमारे,
उपाध्यक्ष, इंद्रायणी सेवा फाउंडेशन

दृष्टिक्षेपात
- मंत्री आळंदीला आले की निव्वळ घोषणा करतात आणि निघून जातात.
- नंतर रंगतात ते निधीबाबतचे कागदी घोडे.
- अमुक ठिकाणी प्रस्ताव पाठवला आहे, प्रस्ताव मंजूर झाला आहे, एवढ्याच गप्पा.
- प्रशासन इंद्रायणी नदीबाबत पूर्णतः उदासीन आहे.


असे आहे सध्याचे विदारक चित्र
- इंद्रायणीच्या उगमस्थानापासून ते संगमस्थानापर्यंत सर्रास इंद्रायणीचे प्रदूषण वाढले आहे
- ग्रामपंचायत, नगरपरिषद हद्दीमधून नदीपात्रात थेट मैलामिश्रित पाणी
- एसटीपी प्रकल्प अजूनही अस्तित्वात नाहीत
- जे अस्तित्वात आहेत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत.
- सांडपाणी सोडल्याने इंद्रायणीचा श्वास कायमचा गुदमरला

इंद्रायणीबाबत सरकारचा दुजाभाव का?
बारामती नगरपरिषद हद्दीत कोट्यवधी रुपये खर्चून नदी संवर्धन आणि घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीतील इंद्रायणी नदीबाबत राज्य सरकारचा दुजाभाव का? असा प्रश्न आता आळंदीकर विचारत आहेत.

08540

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT