Industrial-Security
Industrial-Security 
पुणे

औद्योगिक सुरक्षेला समस्यांनी घेरले

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - उद्योगधंदे आणि कामगारांची सुरक्षा कायम राखण्यासाठी शहर परिसरातील कारखान्यांच्या नियमित तपासणीचे काम करताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला निरनिराळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा कारखान्यांच्या तपासणीचे काम अपूर्ण राहत असून, त्याचा विपरीत परिणाम कामगारांच्या सुरक्षा आणि आरोग्यावर होण्याची भीती वर्तविली जात आहे.

औद्योगिक सुरक्षेसाठी कारखान्यांचे सप्टेंबर २०१७ पासून तपासणीविषयक कामकाज केंद्रीय निरीक्षण प्रणालीच्या साह्याने ऑनलाइन करण्यात आले. त्यानुसार महिनाभराची कारखान्यांची निरीक्षण यादी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला पाठविली जाते. परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांची त्या त्या महिन्यांतील निरीक्षणे निरनिराळ्या कारणास्तव अपूर्ण राहत आहेत. त्यामुळे तपासणी न झालेल्या कारखान्यांचे नाव प्रलंबित राहत आहे.

संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीआयएस’ प्रणालीमधील पूर्वनियोजित वेळापत्रकाबद्दल संबंधित कारखानदारांनाही ऑनलाइन माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळे कारखानदारांना संबंधित कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे शक्‍य होते. मात्र कार्यालयीन, न्यायालयीन कामकाजात हजेरी, मंत्रालय, जिल्हाधिकारी स्तरावरील बैठका तसेच सीआयएस यादीतील एका दिवशी प्राप्त होणारे कारखाने भौगोलिकदृष्ट्या बऱ्याच अंतरावर असतात. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार कारखान्यांची तपासणी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कामगार कल्याण कार्यालय, कामगार अधिकारी आणि औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांच्या एकत्रित पथकाकडूनही महिन्याला कारखान्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र त्यातही समस्या उद्‌भवत आहेत.

आम्हाला महिन्याला ‘सीआयएस’अंतर्गत पाच कारखान्यांची एकत्रितपणे आणि पंचवीस कारखान्यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश मिळतात. परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कामगार कल्याण, कामगार आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या वेळा प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजामुळे एकत्रित जुळून येणे अवघड झाले आहे. तरी निर्धारित वेळापत्रकानुसार आम्ही ऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत आलो आहोत.
- हेमंत धेंड, सहसंचालक, (पुणे विभाग-२), औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT