पुणे

घाऊक महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकावर पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनदरवाढीचा फटका, महागाईदर ८.३ टक्क्यांवर

CD

घाऊक महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकावर
पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनदरवाढीचा फटका, महागाईदर ८.३ टक्क्यांवर

नवी दिल्ली, ता. १४ ः पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे, घाऊक किंमत आधारित महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकावर, म्हणजेच ८.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. घाऊक महागाई मार्चमध्ये ३.८८ टक्के होती, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ती ०.८५ टक्के होती. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे महागाईच्या या मुख्य दरात मोठी उसळी दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

पश्चिम आशियातील युद्ध आणि ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ची नाकेबंदी यामुळे भारतात होणाऱ्या कच्च्या पेट्रोलियमच्या आयातीत अडथळे येत आहेत.शिवाय, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे इंधनाची आयात अधिकच महाग झाली आहे. खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, इतर उत्पादित वस्तू आणि अन्न-व्यतिरिक्त इतर वस्तू आदींच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई उच्चांकी गेली आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. घाऊक महागाईमध्ये झालेली ही क्रमवार वाढही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे जागतिक ब्रोकरेज संस्था ‘बार्कलेज’ने म्हटले आहे


कोट
ऊर्जेच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम आणि या ऊर्जेचा वापर करणारे उत्पादन क्षेत्र यांच्या माध्यमातून, मे २०२६ पर्यंत एकूण घाऊक महागाईचा दर आणखी वाढून नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. घाऊक महागाई निर्देशांकात इंधनाला अधिक महत्त्व आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा भार आतापर्यंत सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी उचलला होता. आता हा भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे;तसेच ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामामुळे महागाई वाढण्याचा धोकाही कायम आहे.
- मेघा अरोरा, संचालक, इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च

प्रमुख महागाईदर
इंधन,ऊर्जा - २४.७१ टक्के - ४२ महिन्यांचा उच्चांक
कच्च्या पेट्रोलियम- ८८.०६ टक्के -ऑक्टोबर २०२१ नंतरचा सर्वोच्च दर
अन्नपदार्थ- १.९८ टक्के
इतर वस्तू- १२.१८ टक्के
उत्पादित वस्तू- ४.६२ टक्के
एलपीजी- १०.९२ टक्के
पेट्रोल - ३२.४० टक्के
डिझेल- २५.१९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT