One Click
One Click Sakal
पुणे

पुणे पालिकेच्या कामांची माहिती एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेत मुख्य खात्यापासून ते क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी आता ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ या संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

पुणे - महापालिकेत (Pune Municipal) मुख्य खात्यापासून ते क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी आता ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ (Integrated work Management System) या संगणक प्रणालीचा (Computer Process) वापर केला जाणार आहे. यामुळे सर्व कामांची माहिती (Work Information) आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पथ, विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, भवन या अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित विभागात या प्रणालीचा वापर होणार आहे.

महापालिकेत मुख्य खात्यांकडून सुमारे ४ हजार ५०० पूर्वगणक तयार करून निविदा मागविल्या जातात. तर क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर हाच आकडा ६ हजाराच्या पुढे जातो. वर्षाला ३५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढल्या जातात. या हजारो कोटीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ नावाची संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातील गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती संकलित केली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षांतील काम आणि त्यासाठी असलेली तरतूदही असणार आहे.

या प्रणालीमुळे होणारे फायदे

  • ज्या ठिकाणी काम करायचे आहे, तेथे जीआयएस मॅपने टॅग केले जाईल.

  • त्यामुळे यापूर्वी केलेल्या कामाची सर्व माहिती उपलब्ध होणार

  • एकाच कामासाठी दुबार खर्च होणार नाही.

  • संगणक प्रणालीत प्रकल्प सल्लागार, ठेकेदार यांनाही लॉगइन देता येणार

  • कामासंदर्भात सूचना देणे, गुणवत्ता तपासणे, पूर्वगणक पत्रक सादर करणे, कामाची बिले सादर करणे, तपासणी करणे शक्य

  • ही प्रणाली भविष्यात सॅप प्रणालीद्वारे मुख्य लेखापाल कार्यालयाशी जोडली जाणार

  • पूर्णगणक पत्रक ते अंतिम बिल काढेपर्यंतची प्रक्रिया पेपरलेस होईल

  • संगणकासह मोबाईल ॲपद्वारेही ही प्रणाली वापरता येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT